Weight Loss Story : वजन कमी करणं ही काही जादू नाही तर चांगल्या सवयींचा परिणाम आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण आहे प्रांजल पांडे. प्रांजलने मेहनतीच्या जोरावर १५४ किलो वजनावरुन थेट ६५ पर्यंत उतरली. प्रांजलने तब्बल ८५ किलो वजन कमी केलं आहे. ती स्वत: एक न्यूट्रिशनिस्ट आणि वेट लॉस कोच आहे. ती म्हणते केवळ डाएटमुळे वजन कमी करता येत नाही, तर यासाठी चांगल्या लाइफस्टाइलचा अवलंब करणं आवश्यक आहे.
जाणून घेऊया अशी ८ कामं जी आजही प्रांजल दररोज फॉलो करते...
१ सकाळची सुरुवात - दररोज सकाळी लिंबाचा रस किंवा अॅपल सायडर व्हिनेगर घालून कोमट पाणी प्यावं. यामुळे पोट फुगत नाही आणि लिव्हर स्वच्छ राहतं.
२ जेवणापूर्वी सॅलेड - दुपारचं किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी फायबरयुक्त पदार्थ उदाहरणार्थ सॅलेड अवश्य खा. ज्यामुळे शरीरातील इन्शुलिनची पातळी अचानक वाढत नाही.
३ फळांसह प्रोटीन खा - फक्त फळं खाण्याऐवजी त्याच्यासोबत प्रोटीन किंवा हेल्दी फॅट्स खा. उदा. सफरचंदासह पीनट बटर किंवा दह्यासह जांभूळ. पीसीओएसमध्ये हा बदल फायदेशीर ठरतो.
४ खूप पाणी प्या - शरीरातील घाणं आणि फॅट बाहेर काढण्यासाठी दिवसभरात कमीत कमी चार लीटर पाणी प्या.
५ जेवल्यानंतर चाला - प्रत्येकवेळी खाल्ल्यानंतर दहा मिनिटं चाला. चालू शकत नसाल तर १० ते १५ वेळा उठा-बशा काढा.
६ लवकर जेवा - झोपण्यापूर्वी किमात २ ते ३ तासांपूर्वी रात्रीचं जेवण करा.
७ प्रोटीन आवश्यक - तुमच्या प्रत्येक आहारात प्रोटीनयुक्त (डाळ, पनीर, अंडी आदी) पदार्थांचा समावेश करा. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि बाहेरील चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही.
८ सक्रिय राहा - दररोज कोणता ना कोणता व्यायाम करा. जिम शक्य नसेल तर पायी चाला किंवा रनिंग हा बेस्ट व्यायाम आहे.
जगात काहीही अशक्य नाही, प्रांजल पांडेच्या कहाणीवरुन हेच अधोरेखित होतं.