Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time: रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि सणाचे महत्त्व

Raksha Bandhan 2024 Date: भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सणाचे प्रचंड महत्त्व आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक...

जाहिरात
Read Time: 2 mins
Raksha Bandhan 2024 Date: रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2024: हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाच्या सुखासाठी आणि उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे, तिला सुखी ठेवण्याचे वचन देतो. भाऊबहिणीच्या नात्यातील प्रेम कधीही कमी होत नाही, ते दिवसेंदिवस अधिक पक्के आणि वाढत जाते. यंदा रक्षाबंधनाचा सण कधी (Raksha Bandhan 2024 Date) आहे? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2024 Muhurat) काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Advertisement

(नक्की वाचा: Raksha Bandhan Wishes: ओवाळीते भाऊराया रे!भाऊ-बहिणीला हे खास मेसेज पाठवून व्यक्त करा तुमची माया)

रक्षाबंधन 2024 कधी आहे? कोणत्या मुहूर्तावर बांधावी राखी? l Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Time

  • हिंदू पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. 
  • रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मुहूर्त दुपारी 01.43 वाजेपासून ते संध्याकाळी 04:20 वाजेपर्यंत आहे.
  • प्रदोष वेळ रक्षाबंधन मुहूर्त संध्याकाळी 06.56 वाजेपासू ते रात्री 09:08 वाजेपर्यंत आहे.
  • रक्षाबंधन भद्र समाप्ती – दुपारी 01.30 वाजता.
  • रक्षाबंधन भद्र पुंछा - सकाळी 09.51 वाजेपासून ते सकाळी 10.53 वाजेपर्यंत आहे.
  • रक्षाबंधन भद्र मुख - सकाळी 10.53 वाजेपासून ते दुपारी 12.37 वाजेपर्यंत आहे.
  • पौर्णिमा तिथी - 19 ऑगस्ट 2024 पहाटे 03.04 वाजेपासून ते रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट, कोणत्या मुहूर्तावर भावाला बांधावी राखी?)

रक्षाबंधनाचा सण का साजरा केला जातो? (Raksha Bandhan History)

प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आणि महाकाव्यांमध्येही रक्षाबंधनाचा उल्लेख आहे. एका प्रचलित कथेनुसार, महाभारतामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले होते, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडी पदर फाडला आणि कृष्णदेवतेच्या रक्तबंबाळ झालेल्या बोटावर बांधला. द्रौपदीचे इतके प्रेम पाहून कृष्णदेवतेने बहीण म्हणून तिचे प्रत्येक संकाटमध्ये रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासूनच रक्षाबंधन सणाची सुरुवात झाली, असे मानले जाते.

Advertisement

Advertisement

(नक्की वाचा: राखी पौर्णिमेच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास करावा का? काय आहे नियम?)

रक्षाबंधन सणाचे महत्त्व 

रक्षाबंधन या सणाचे हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व आहे. भाऊ-बहिणीतील प्रेम आणि मायेचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिणी आणि भाऊ पारंपरिक पोषाख परिधान करतात. बहीण भावाचे औक्षण करते. कपाळा टिळा लावून मिठाई भरवून त्याला राखी बांधते. भाऊ आणि बहिणी दोघंही एकमेकांच्या सुखी जीवन, निरोगी आरोग्य, उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात. 

(नक्की वाचा: राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती)

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.