जाहिरात

Raksha Bandhan 2025 Date: रक्षाबंधन कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, तिथी, महत्त्व, मंत्र व पौराणिक कथा जाणून घ्या

Raksha Bandhan 2025 Date And Time: यंदा रक्षाबंधन सण कधी साजरा केला जाणार आहे? शुभ योग आणि शुभ मुहूर्तासह सर्व माहिती एका क्लिकवर जाणून घ्या...

Raksha Bandhan 2025 Date: रक्षाबंधन कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, तिथी, महत्त्व, मंत्र व पौराणिक कथा जाणून घ्या
Raksha Bandhan 2025 Date And Time: यंदा रक्षाबंधन कधी आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट?

Raksha Bandhan 2025 Date And Time: भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक मानला जाणार सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन शब्दाचा अर्थ म्हणजे रक्षणाचे बंधन (Raksha Bandhan Meaning) असे म्हणतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची, सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात. भाऊ देखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने साजरी केली जातेय. यंदा रक्षाबंधन सण कधी आहे, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी, या सणाशी संबंधित पौराणिक कथा कोणत्या आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

राखी पौर्णिमा तिथी (Rakhi Purnima 2025 Tithi) 

पंचांगानुसार रक्षाबंधन सणाची पौर्णिमा तिथी (Raksha Bandhan 2025 Tithi) 8 ऑगस्ट रोजी (8th August 2025) दुपारी 2.12 वाजता सुरू होणार आहे आणि 9 ऑगस्ट (9th August 2025) रोजी दुपारी 1.24 वाजता तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) उत्सव 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाईल. 

रक्षाबंधन सणाला राखी बांधण्याचा मुहूर्त (Raksha Bandhan 2025 Puja Muhurat)

रक्षाबंधनाच्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त ((Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat) सकाळी 5.47 वाजेपासून ते दुपारी 1.24 वाजेपर्यंत असणार आहे. यानुसार तब्बल 7.37 तासांचा शुभ काळ आहे. 

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाचा इतक्या तासांचा आहे शुभ मुहूर्त, भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या राशीनुसार अशी निवडा राखी

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाचा इतक्या तासांचा आहे शुभ मुहूर्त, भावाच्या प्रगतीसाठी त्याच्या राशीनुसार अशी निवडा राखी)

रक्षाबंधन 2025 शुभ योग आणि शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat And Shubh Yog)

  • ब्रह्म मुहूर्त : 9 ऑगस्ट रोजी पहाटे 4.22 वाजेपासून ते 5.02 वाजेपर्यंत असेल. 
  • अभिजीत मुहूर्त : 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.17 वाजेपासून ते 12.53 वाजेपर्यंत असेल. 
  • सौभाग्य मुहूर्त : 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.08 वाजेपासून ते 10 ऑगस्ट पहाटे 2.15 वाजेपर्यंत असेल. 
  • सर्वार्थ सिद्धी योग : 9 ऑगस्ट सकाळी 5.47 वाजेपासून ते दुपारी 2.23 वाजेपर्यंत असेल. 

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी कशी बांधावी? (How To Tie Rakhi To Your Brother)

  • घरामध्ये स्वच्छ जागेवर पाट मांडावा, त्याभोवती रांगोळी काढावी.
  • भावाला पाटावर बसायला सांगावे.
  • औक्षणाच्या थाळीमध्ये हळद कुंकू, अक्षदा, श्रीफळ, दिवा, मिठाई, राखी इत्यादी आवश्यक पूजा सामग्री ठेवावी. 
  • भावाच्या कपाळावर टिळा लावून अक्षदा लावा. 
  • औक्षण करुन मनगटावर राखी बांधा आणि मिठाई भरावी. 
  • भावाच्या दीर्घायुष्य आणि सुखी जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करावी. 

भावाला राखी बांधताना कोणता मंत्र म्हणावा? (Raksha Bandhan Mantra)

ॐ येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल

Raksha Bandhan 2025: यंदा रक्षाबंधन कधी आहे? योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि राखी काढण्याची माहिती जाणून घ्या

(नक्की वाचा: Raksha Bandhan 2025: राखी काढण्याची माहिती जाणून घ्या)

रक्षाबंधन सणाच्या पौराणिक कथा (Raksha Bandhan Mythology)

1. माता लक्ष्मी आणि राजा बळी यांची कथा

हिंदू मान्यतेनुसार, भगवान विष्णूने वामन रूप धारण केले आणि तीन पावलांमध्ये आकाश, पाताळ मोजले आणि बळीराजाला पाताळात पाठवले. त्यानंतर तपश्चर्येने राजाने भगवान विष्णूकडून नेहमी त्यांच्यासमोर राहण्याचे वचन मागितले. यादरम्यान भगवान विष्णू वैकुंठ धाममध्ये पोहोचले नाहीत म्हणून माता लक्ष्मी यांना काळजी वाटू लागली. तेव्हा नारदजींनी मातेला या समस्येवर उपाय सुचवला. त्यानुसार माता लक्ष्मी बळीराजाकडे गेल्या आणि त्यांना आपला भाऊ बनवले, त्यांच्या हातावर रक्षासूत्र बांधले. असे मानले जाते की ज्या दिवशी माता लक्ष्मीने बळी राजाला आपला भाऊ मानले तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत आहेत.

2. द्रौपदी आणि भगवान कृष्णाची कथा

महाभारत काळातील कथेनुसार जेव्हा भगवान कृष्णाने शिशुपालचा त्याच्या सुदर्शन चक्राने वध केला होता, तेव्हा श्री कृष्ण यांच्या तर्जनीला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी द्रौपदीने तिची साडी फाडून कापड श्रीकृष्णाच्या बोटाला बांधले. असे मानले जाते की तो दिवस देखील श्रावण पौर्णिमेचा होता. यावेळेस संकटाच्या काळात तुझे रक्षण करेन, असे वचन भगवान कृष्णाने द्रौपदीला दिले होते.  

3. यम आणि यमुना यांची कहाणी 

पौराणिक मान्यतेनुसार भगवान सूर्याचा मुलगा यम आणि यमुना या भाऊबहिणींमध्ये खूप प्रेम होते, पण दोघेही त्यांच्या कर्तव्यांमुळे एकमेकांना भेटू शकले नाहीत. एके दिवशी यमुनाने ठरवले की जोपर्यंत भाऊ भेटायला येत नाही तोवर कोणत्याही गोष्टीचे सेवन करणार नाही. याबाबतची माहिती यमदेवतेला समजल्यानंतर ते घाईघाईने बहीण यमुनाला भेटायला गेले. असे मानले जाते की ज्या दिवशी यमदेवता यमुनेला भेटायला गेले होते तो श्रावण पौर्णिमेचा दिवस होता. त्याच दिवशी यमुनेने या भावाच्या हातावर रक्षासूत्र देखील बांधले. असे मानले जाते की त्या दिवशी यमदेवतेने बहीण यमुनेला वचन दिले होते की जी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधेल, ती त्याच्यावरील मृत्यूचे भय दूर करेल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com