जाहिरात

Raksha Bandhan 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे रुसणे, हसणे, जीवापाड प्रेम करणे;रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा

Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधन सणानिमित्त भाऊबहिणीला पाठवा हे खास मेसेज.

Raksha Bandhan 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे रुसणे, हसणे, जीवापाड प्रेम करणे;रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा
"Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या खास शुभेच्छा पाठवा"

Raksha Bandhan 2025 Wishes: भाऊबहिणीचे नाते म्हणजे अथांग प्रेम आणि विश्वासाचे बंधन. दादाताईमधील या गोड नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधनाचा सण. रक्षाबंधन सणानिमित्त तुमच्या लाडक्या ताई दादा खास मेसेज पाठवायला विसरू नका. तुमच्या एका मेसेजमुळे त्यांच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल.  

रक्षाबंधन सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan 2025 Wishes In Marathi)

1. राखी म्हणजे प्रेम
राखी म्हणजे ओलावा 
तुझे माझ्यावर असलेले प्रेम
माझ्या जीवनाचा खरा अर्थ 

2. किती वेळा भांडलो आपण
किती वेळा दूर गेलो
पण राखी आली की
सर्व दुरावा जातो पळून

3. बहीण म्हणजे आईची सावली 
कधी हसवणारी, कधी रडवणारी 
पण शेवटी हृदयात कायम घर करणारी

4. तुझ्या राखीने मला दिले आश्वासन 
प्रत्येक संकटात असतो मी तुझ्यासोबत हे पक्के वचन 

5. सण हा फुलांचा 
भावनांचा, आठवणींचा 
भाऊबहिणीच्या प्रेमाचा 
रक्षाबंधन म्हणजे आयुष्याच्या नात्यांचा

6. एक राखी, एक गाठ
एक हक्क, एक साथ
तुझ्यामुळेच वाटते
हे नाते जगातले सर्वात खास!

7. भाऊबहिणीचे नाते 
नकळत तयार झालेली कविताच जणू 
जिथे शब्द कमी आणि भावना अधिक असतात 

8. राखीचा तो नाजूक धागा 
पण तुझे प्रेम अधिक बळकट 
शब्दात सांगता येणार नाही
पण मनात जपतो मी नात्याचा प्रत्येक क्षण 

9. राखी बांधताना वाटते
खूप काही बदलले 
पण हे नाते अजूनही
तितकेच आपुलकीचे आहे

10. आईनंतर जर कुणी समजून घेतले असेल 
तर ती माझी बहीण आहे
राखीचे फुलपाखरू आहे ती

Happy Raksha Bandhan 2025 Wishes: राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! रक्षाबंधनानिमित्त भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज

(नक्की वाचा: Happy Raksha Bandhan 2025 Wishes: राखीचा धागा म्हणजे प्रेमाचा अतूट विश्वास! रक्षाबंधनानिमित्त भाऊबहिणीला पाठवा खास मेसेज)

Raksha Bandhan Quotes In Marathi 

1. तू माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायक आहेस 
तुझे यश, तुझी मेहनत सर्व काही मला खूप अभिमानास्पद वाटते
माझी राखी तुझे रक्षण देव करेल आणि मीही सदैव तुझ्या पाठीशी असेन

2. राखी म्हणजे केवळ एक धागा नाही, तर भावनांचा पूल आहे
तू माझ्यासोबत नसलीस तरी तुझ्या आठवणी आणि प्रेम माझ्यासोबत आहे 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, गोड बहीण!

3. तू प्रत्येक संकटात माझ्या मागे उभा राहिलास
मला कधीच एकटे वाटू दिले नाहीस
रक्षाबंधनाच्या दिनी तुला शुभेच्छा देते की देव तुला सर्व सुख आणि यश देईल
Happy Raksha Bandhan 2025

4. आपले बालपणीचे क्षण आणि तुझे निरागस हास्य
हे सर्व आठवतंय आज 
तू कितीही दूर असलास तरी तुझी जागा कायम माझ्या हृदयात 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

5. तुझ्या राखीने माझ्या हातात केवळ धागा नव्हे 
तर जबाबदारी आणि प्रेम गुंफलंय
तुझे रक्षण हे माझे कर्तव्य आहे 
नेहमी आनंदात राहो हीच माझी प्रार्थना आहे 

6. तुझे रुसणे, हसणे आणि जीवापाड प्रेम करणे 
सर्व काही खास आहे
तू माझी लाडकी आहेस आणि कायम राहशील
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

7. यंदा तुला राखी बांधता येणार नाही
पण मनात तुझ्यासाठी प्रेम ओतप्रोत आहे 
तुझे रक्षण देव करो आणि आपले नाते असंच टिकून राहो 

8. तुझे अस्तित्वच माझ्या जीवनात आनंद घेऊन येते
तुझ्या राखीची आठवण, तुझे खंबीर प्रेम
यासाठी मी देवाचे आभार मानते
रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा!

9. कधीकधी भांडणे झाली
कधीकधी रुसवेफुगवे 
पण प्रेम कधीच आटलं नाही
ही राखी त्या सर्व आठवणींचे प्रतीक आहे
तुला आनंदी जीवन लाभो!

10. आजच्या दिवशी आपल्या नात्याला एक नवीन उंची मिळो
प्रेम, विश्वास आणि काळजीचे प्रतीक असलेली राखी 
आपल्याला सदैव जोडून ठेवो
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधनानिमित्त फेसबुक स्टोरी मेसेज (Raksha Bandhan 2025 Facebook Status)

1. सर्व काही मिळेल
पण बहिणीसारखी माणुसकी
आणि प्रेम कुठेच मिळणार नाही!

2. राखी म्हणजे आठवण
जुन्या क्षणांची, भांडणांची आणि प्रेमाच्या मिठीत गुंतलेल्या मनांची 

3. तिच्या हसण्यात माझे सुख आहे 
ती हसली की वाटते 
जिंकली मी दुनिया सारी

4. राखीचा धागा असतो बळकट
मनामनात गुंफलेला
कधी न तुटणारा
हृदयाशी जपलेला 

5. भाऊबहिणीचे नाते असते
कधी न बोलता समजून घेणारे

6. जगात कितीही नाती असो
पण बहिणीचे प्रेम
पक्के आणि अनमोल असते

7. कधी वाटते ती लहान आहे
कधी वाटते ती खूप समजूतदार आहे
माझी बहीण सर्वात खास आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. एक छोटीशी राखी
पण भावनांनी भरलेली!
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा! 

9. भाऊबहिणीच्या प्रेमाला वय लागत नाही 
फक्त मन लागते 

10. तुझ्या हातात राखी
माझ्या हृदयात वचन
कायम तुझ्यासोबत राहण्याचे!  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com