जाहिरात

Sweets Test: सण आले, पण मिठाईत भेसळ! खरी-खोटी मिठाई घरीच ओळखण्याची जाणून घ्या सोपी पद्धत

मिठाईची किंमत जर खूप कमी असेल, तर ती भेसळयुक्त असण्याची शक्यता अधिक आहे.

Sweets Test: सण आले, पण मिठाईत भेसळ! खरी-खोटी मिठाई घरीच ओळखण्याची जाणून घ्या सोपी पद्धत

Real vs Fake Sweets Test: सण-उत्सवाच्या काळात बाजारात मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. नेमक्या याच वेळी भेसळीचा धोकाही वाढतो. अनेकदा माहिती नसल्यामुळे नागरिक भेसळयुक्त मिठाई विकत घेऊन जातात. जी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ डॉ. समीर भाटी यांनी घरीच असली आणि नकली मिठाई ओळखण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या चांगली आणि वाईट मिठाई ओळखता येणार आहे. त्यातून पुढील धोकाही तुम्हाला टाळता येईल.  

नकली मिठाई ओळखण्यासाठी घरगुती चाचण्या

चांदीच्या वर्खाची तपासणी:

  • मिठाईवर लावलेला वर्क बोटांनी हलकासा चोळा. खरी चांदीचा वर्क लगेच गायब होतो. कोणताही अवशेष सोडत नाही. याउलट, अॅल्युमिनियमचा नकली वर्क चोळल्यावर बोटांना चिकटून राहतो किंवा सहजपणे नष्ट होत नाही.

स्टार्चची भेसळ:

  • मिठाईच्या लहान तुकड्यावर आयोडीनचे (Iodine) काही थेंब टाका. जर रंग निळा किंवा जांभळा झाला, तर त्यामध्ये कॉर्न फ्लोअर (Corn Flour) किंवा मैदा यांसारख्या स्टार्चची भेसळ आहे, हे लक्षात घ्या.

रंग तपासणी:

  • मिठाई टिश्यू पेपरवर (Tissue Paper) हलक्या हाताने चोळा. टिश्यू पेपरवर रंग उतरला, तर मिठाईत अति कृत्रिम रंग मिसळले आहेत. तसेच, गरम पाण्यात (Hot Water) मिठाई विरघळवल्यास पाण्याचा रंग बदलल्यास भेसळ सिद्ध होते. बेसनच्या लाडवांचा रंग जास्त पिवळा असल्यास सावध राहा, कारण खऱ्या बेसनाचा रंग हलका तपकिरी पिवळा (Brownish Yellow) असतो.

वनस्पती तूप (Vanaspati Ghee):

  • खरे तूप एकाच स्तराचे असते. जर तुपात वनस्पती तेल मिसळले असेल, तर ते वेगळ्या थरांमध्ये दिसेल. तसेच, 1 चमचा तुपात HCL आणि थोडी साखर मिसळून मिश्रण गुलाबी झाल्यास (Pinkish), भेसळ असल्याचे सिद्ध होते.

क्वालिटीला महत्त्व द्या
मिठाईची किंमत जर खूप कमी असेल, तर ती भेसळयुक्त असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे उत्तम दर्जाला (Quality) प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com