Husband Wife Relationship: पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य बाब आहे, पण भांडणं कशी मिटवावी? नातं कसं टिकवून ठेवावं? यावर जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्या नात्याचा पाया भक्कम आहे की नाही, हे कळतं. कित्येकदा रागामध्ये म्हटले गेलेले शब्द मनाला लागतात आणि छोट्या वादातून मोठी भांडणं घडतात. अशा परिस्थितीत जोडप्यांनी भलतेसलते विचार करण्यापेक्षा एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भांडण झाल्यानंतर काही लोकांना शांत राहायला आवडतं तर काही लोक नात्यामध्ये कायमचा दुरावा आणतात. म्हणूनच कोणत्याही प्रकारचे वाद झाल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला शांत करा आणि त्यावर तोडगा काढण्याचा विचार करा. लग्न हे एक पार्टनरशिप आहे, जेथे जिंकणं महत्त्वाचे नसते तर एकत्र राहणं आवश्यक असते. भांडणावर तोडगा काढून नाते मजबूत कसं करावं? याबाबत माहिती जाणून घेऊया...
पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी काय करावे?
1. सर्वप्रथम स्वतःला शांत करा
पार्टनरसोबत वाद झाल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देण्याऐवजी काही काळ शांत राहा. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला थोडा वेळ द्या. यामुळे तुमच्या मेंदूतील विचार स्पष्ट होतील आणि रागावरही नियंत्रण मिळवता येईल. मन शांत असतानाच केलेल्या संभाषणामध्ये समस्येवर तोडगा निघेल.
2. पार्टनरचे म्हणणं पूर्णपणे ऐका
बहुतांश वेळेस आपल्याला उत्तर देण्याची इतकी घाई असते की आपण समोरच्या व्यक्तीचे म्हणणं कधीही ऐकत नाही. तुमच्या पार्टनरचे नेमकं काय म्हणणंय, हे त्याला/तिला कुठेही न थांबवता पूर्णपणे ऐका. त्याच्या भावनांचा आदर करा. यामुळे तुमचं नातं अधिक पक्के होऊ शकते.
3. 'मी' ऐवजी कायम 'आपण' असा विचार करा
नात्यातील प्रत्येक समस्येकडे वैयक्तिक म्हणून न पाहता त्या दोघांच्या समस्या असल्याच्या दृष्टीकोनातून पाहावं. तू कायमच असं वागतोस/वागतेस अशा वाक्याने नात्यातील तणाव वाढतो. याऐवजी आपण आताची परिस्थिती कशी सुधारू शकतो? यावर लक्ष केंद्रित करा. ज्यामुळे तुमच्या दोघांमधील वाद वाढण्याऐवजी कमी होतील.
(नक्की वाचा: Relationship Tips: रॉयल स्लीप पोझिशन म्हणजे काय? पती-पत्नीचे नातं सात जन्मांपर्यंत राहील मजबूत आणि सुरक्षित)
4. स्वतःच्या चुका स्वीकारा
तुमची चूक असेल तर ती स्वीकारा आणि आपल्या पार्टनरची माफी मागा. माफी मागितल्यास तुम्ही तुमच्या नात्याला अधिक महत्त्व देताय, हे स्पष्टपणे दिसते. प्रामाणिकपणा हा प्रत्येक नात्याचा पाया असतो.
5. एकमेकांना वेळ द्याकित्येकदा पटापट बोलणं करण्याऐवजी नात्यासाठी एकमेकांना वेळ द्यावा. यामुळे दोघांचाही मेंदू शांत होईल आणि तुम्ही दोघंही वाद सोडवण्यासाठी योग्य पद्धतीने संवाद साधू शकाल.
(नक्की वाचा: Winter Health News: हिवाळ्यात दारू पिऊ शकतो? एका दिवसात किती दारू प्यावी, 99% लोकांना माहितीच नाहीय अचूक उत्तर)
6. संवाद 7. प्रेमानं वाद मिटवाप्रेम आणि नात्यातील आदरापेक्षा वाद महत्त्वाचा नाही, हे लक्षात घ्या. प्रेमाने एकमेकांना दिलेली मिठी, प्रेमाने केलेला संवाद यामुळे नात्यातील तणाव कमी होईल. अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नातं मजबूत होण्यास मदत मिळेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

