सर्वसामान्यांसाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि चांगली बातमी आहे. लवकरच कॅन्सरवर लस येणार आहे. रशियामध्ये कॅन्सरवरील लशीचं संशोधन यशस्वी झालं आहे. ही लस नेमकी कसं काम करणार आहे आणि भारतात ही लस कधी उपलब्ध होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर जगभरात उपचार शोधले जात आहेत. पण आता रशियाने कॅन्सरवरील पहिली लस विकसित केल्याचा मोठा दावा केला आहे. 2025 पासून ही लस रशियात मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या क्रांतिकारक शोधामागील रशियासमोर मोठी आव्हानं होती.
रशियाच्या वैज्ञानिकांनी कॅन्सरवरची पहिली MRNA तंत्रज्ञानावर आधारित लस विकसित केली आहे. या लसीची खासियत म्हणजे ती प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिकरित्या तयार केली जाणार आहे. ही लस तयार करताना रुग्णाच्या ट्युमरमधून अनुवंशिक माहिती वापरली जाणार आहे. त्या माहितीच्या आधारे लस विकसित केली जाणार आहे. शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली कॅन्सर पेशींवर हल्ला करण्यासाठी सक्षम होते. ही लस शरीरातील ट्युमर पेशींची वाढ थांबवते आणि रोगप्रतिकारक प्रणालीला सक्रिय करते. सध्या, प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीने सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. ही लस 80 टक्के प्रभावी ठरण्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
नक्की वाचा - भीक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार; इंदूर प्रशासनाचा निर्णय, काय आहे कारण?
2025 च्या सुरुवातीपासून सर्व नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध करुन दिली जाईल, अशी घोषणा रशियाच्या आरोग्य मंत्रालयानं केली आहे. ही लस विशेषतः लहान आणि मध्यम अवस्थेतील कॅन्सर रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. मात्र, या लसीबाबत पुरेसा डेटा आणि चाचण्यांच्या अभावामुळे लसीच्या परिणामकारकतेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत .
रशियाचा हा शोध निश्चितच आशादायी आहे. मात्र लसीची परिणामकारकता किती हे कळण्यासाठी आणखी काही चाचण्या आवश्यक आहेत. तसंच WHO ची मान्यता कधी मिळणार आणि जागतिक बाजारपेठेत ही लस कधी उपलब्ध होणार, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र ही लस यशस्वी झाली तर वैद्यकीय क्षेत्रामधली ती मोठी क्रांती असेल आणि माणसांसाठीही मोठं वरदान ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world