SBI ची 'आशा' शिष्यवृत्ती; 23 हजार विद्यार्थ्यांना होणार 20 लाख रुपयांपर्यंत मदत

इच्छुक विद्यार्थी www.sbiashascholarship.co.in या अधिकृत पोर्टलवर अधिक माहिती मिळवू शकतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

SBI Scholership: भारतीय स्टेट बँक त्यांच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत आहे. यावर्षी, देशभरातील 23,000 पेक्षा जास्त होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना ‘एसबीआय प्लॅटिनम जुबिली आशा शिष्यवृत्ती 2025' योजनेचा लाभ मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अधिक सुलभ बनवणे आणि त्यांच्यातील सुप्त प्रतिभेला योग्य पाठबळ देणे हा आहे.

एसबीआयची सीएसआर संस्था 'एसबीआय फाउंडेशन'ने आर्थिक वर्ष 2026 मध्ये शिष्यवृत्तीसाठी 90 कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी 2022 मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आलेली आशा शिष्यवृत्तीत निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या पूर्णतेपर्यंत 15 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत वार्षिक आर्थिक सहाय्य देते.

(नक्की वाचा-  MAHA Metro Recruitment 2025: मेट्रोत वरिष्ठ पदावर नोकरीची संधी! पगार 40 हजार ते 2.80 लाख, चेक करा डिटेल्स)

शिष्यवृत्ती कोणाला मिळणार?

  • शालेय विद्यार्थी (इयत्ता 9 वी ते 12 वी)
  • एनआयआरएफ (NIRF) टॉप 300 किंवा एनएएसी (NAAC) 'ए' रेटेड संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी
  • आयआयटी (IIT) आणि आयआयएम (IIM) मधील स्कॉलर्स
  • वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Courses) करणाऱ्या विद्यार्थ्यांना
  • परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना
  • टॉप 200 क्यूएस (QS) क्रमवारीत असलेल्या विद्यापीठांमध्ये मास्टर्स किंवा उच्च शिक्षण घेणारे अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) चे विद्यार्थी

पात्रतेचे निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • मागील शैक्षणिक वर्षात किमान 75% गुण किंवा 7.0 सीजीपीए (CGPA) आवश्यक.
  • कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा शालेय विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी. तर कॉलेज विद्यार्थ्यांसाठी वार्षिक 6 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी.

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक विद्यार्थी www.sbiashascholarship.co.in या अधिकृत पोर्टलवर अधिक माहिती मिळवू शकतात.

Advertisement

Topics mentioned in this article