
Sharad Purnima 2025 Date And Time: आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीला कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2025) साजरी केली जाते. आश्विन पौर्णिमेस 'कोजागरी पौर्णिमा', 'नवान्न पौर्णिमा', 'शरद पौर्णिमा' असेही म्हणतात. पौर्णिमेच्या रात्री चंद्र, ऐरावत, लक्ष्मीमाता, इंद्र देव यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. तसेच उत्तररात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागरण करणाऱ्या व्यक्तीवर शुभ आशीर्वादांचा वर्षाव करते, असेही म्हणतात. शरद पौर्णिमेची (Sharad Purnima 2025) पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया...
कोजागरी पौर्णिमा | शरद पौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त | Sharad Purnima 2025 Muhurat | Kojagari Purnima
पंचांगातील माहितीनुसार यंदा आश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:23 वाजता सुरू होणार असून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 09:16 पौर्णिमा तिथी समाप्त होईल. त्यामुळे शरद पौर्णिमा 06 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 05:27 वाजता आहे. कोजागरी पौर्णिमेची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त 06 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:45 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर 2025 उत्तररात्री 12:34 वाजेपर्यंत असणार आहे. पूजा करण्यासाठी एकूण 49 मिनिटांचा कालावधी मिळेल. मध्यरात्री लक्ष्मीमाता पृथ्वीतलावर येऊन 'को जागर्ति' म्हणजे ‘कोण जागे आहे ?', असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते,असे म्हणतात.

Photo Credit: Canva
अभिजित मुहूर्त : 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:45 वाजेपासून ते दुपारी12:32 वाजेपर्यंत आहे.
अमृत काळ : 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:40 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तररात्री 01:07 (AM) वाजेपर्यंत आहे.
विजय मुहूर्त : 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 02:06 वाजेपासून ते 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 02:53 वाजेपर्यंत आहे.
गोधूलि मुहूर्त : 6 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 06:01 वाजेपासून ते 6 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 06:26 वाजेपर्यंत आहे.
निशिता मुहूर्त: 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:45 वाजेपासून ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तररात्री 12:34 (AM) वाजेपर्यंत आहे.
ब्रह्म मुहूर्त : 6 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 04:39 वाजेपासून ते 6 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 05:28 वाजेपर्यंत आहे.
कोजागरी उत्सव साजरा करण्याची पद्धत Kojagari Purnima 2025 Date And Timings
- शरद पौर्णिमेच्या दिवशी शेतामध्ये नवीन पिकवलेल्या धान्याने जेवण तयार करण्याची पद्धत आहे.
- लक्ष्मीमाता आणि ऐरावतावर बसलेले इंद्र देव यांचीही रात्री पूजा केली जाते.
- पूजा केल्यानंतर देवांसह पितरांनाही आटवलेले दूध, पोहे, नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते.
- चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो आणि तेच दूध नंतर प्रसाद म्हणून प्यायले जाते. हे दूध आरोग्यासाठी लाभदायक असते, असे म्हणतात.

Photo Credit: Canva
कोजागरी पौर्णिमा | शरद पौर्णिमेची पूजा विधी | Sharad Purnima 2025 Puja Vidhi | Kojagari Purnima 2025
- आश्विन पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा.
- स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर उपवास करण्याचा संकल्प करावा.
- देवघरात किंवा घराच्या ईशान्य दिशेला चौरंगावर देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. त्यावर गंगाजल शिंपडा.
- पंचोपचार पूजा करावी. धूप-अगरबत्ती, दिवे प्रज्वलित करा.
- हळदकुंकू चंदन फुले अर्पण करावे.
- देवांची आरती-प्रार्थना करावी.
- नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसादाचे वाटप करावे.
कोजागरी पौर्णिमा | शरद पौर्णिमाचे धार्मिक महत्त्व | Sharad Purnima 2025 Importance | Kojagari Purnima
- मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा शीतल प्रकाश शरीरावर पडणे शुभ मानले जाते.
- चंद्र प्रकाशामुळे मन शांत होण्यास मदत मिळते.
- शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र प्रकाशात ठेवलेले दूध पिणे आरोग्य आणि नशिबासाठी चांगले मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world