- रात्रीच्या वेळी काही लोकांना आपल्याला कोणीतरी पाहत असल्याचा भास होतो आणि त्यामुळे निद्रा नाश होतो
- मानसिक ताण वाढल्यास शरीरात Cortisol हार्मोनची पातळी वाढते आणि मेंदू अति-सतर्क स्थितीत जातो
- अति-सतर्कतेमुळे साध्या आवाजांवर किंवा सावलींवरही भीती वाटू शकते आणि भास होऊ शकतात
अनेक जणांना रात्रीच्या वेळी भास होत असतात. काहींना तर आपल्या बाजूला कोणी आहे असं वाटतं. तर काहींना आपल्याला कोणी तरी लपून पाहात आहे असं वाटतं. त्यामुळे त्यांना निद्रा नाशाचा त्रास होतो. झोप अपूर्ण होते. या मागे काही शास्त्रीय कारणं आहे. अनेकांना ही माहितच नसतात. सामान्यतः अशा अनुभवांना भूतप्रेत किंवा अदृश्य शक्तींशी जोडले जाण्याचा आतापर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, मानसशास्त्र आणि वैद्यकीय विज्ञानानुसार, हा कोणताही अलौकिक प्रकार नाही. तर हा आपल्या मनाचा आणि मेंदूचा चाललेला अनोखा खेळ आहे.
दैनंदिन जीवनात प्रत्येला ताण असतो. या वाढत्या ताणाचा परिणाम आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर निश्चितच होत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रचंड मानसिक दबावाखाली असते, तेव्हा शरीरात 'Cortisol' नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. हा हार्मोन मेंदूला सतत सतर्क (Alert) राहण्याचा इशारा देत असतो. मानसशास्त्रात या स्थितीला 'Hypervigilance' (अति-सतर्कता) म्हटले जाते. या स्थितीत रात्रीच्या वेळी पंख्याचा आवाज, खिडकीची हालचाल किंवा साधी सावली देखील भीतीदायक वाटते. अशा स्थितीत आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असल्याचा भास होवू लागतो. त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण होते.
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत उशिरापर्यंत मोबाईल वापरणे हे जणून अनिवर्य झाले आहे. कामाच्या व्यापामुळे तर अनेकांची झोप ही उडाली आहे. त्यांना मिळणारी झोप ही अपूरी असते. संशोधनानुसार, सतत 7 ते 8 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांमध्ये असे विचित्र अनुभव येतात. अनेकांना तसे अनुभव ही आले आहेत. शरीराला पुरेशी विश्रांती न मिळाल्यास तो सभोवतालच्या माहितीचे अचूक विश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे अंधारात वेगवेगळ्या आकृत्या दिसणे किंवा कोणाच्या तरी असण्याचा आभास होणे (Hallucinations) असे प्रकार घडतात.
या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यकच नाही तर गरजेची आहे. तशी सवयच लावून घेणं उत्तम मानलं जाईल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करावी असा सल्ला दिला जातो. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळवा. त्या ऐवजी आराम करावा किंवा कुटंबा सोबत वेळ घालवावा. जर हा त्रास वारंवार होत असेल, तर अंधश्रद्धेला बळी न पडता मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा (Psychiatrist) सल्ला घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world