Struggling To Sleep Without A Blanket: दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरुणपांघरुण दिसताच डोळे आपोआप मिटू लागतात. पण अनेकांना अशी सवय असते की, अंगावर चादर किंवा ब्लँकेट घेतल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. मग हवामान कोणतेही असो, उन्हाळा असो वा हिवाळा, जोवर अंगावर पांघरुण घेत नाहीत तोवर त्यांना झोपच येत नाही. तुमच्यासोबतही असं घडतं का? अनेकांना फक्त ही सवय वाटते, पण नुकत्याच झालेल्या काही संशोधनांमध्ये यामागे अतिशय रंजक कारणे समोर आली आहेत. जाणून घेऊया यामागील नेमके कारण काय आहे?

चादर किंवा ब्लँकेटशिवाय झोप का येत नाही?
जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना चादर अंगावर घेतल्याशिवाय झोप येत नाही, तर हे समजून घेणे गरजेचे आहे की ही केवळ एक सवय नाही. संशोधनानुसार याचा थेट संबंध तुमच्या भावनिक आणि मानसिक स्थितीशी असू शकतो. चला समजून घेऊया हे कसे घडते:
(नक्की वाचा : स्ट्रॉने नारळ पाणी पिता? हिरव्या नारळाच्या आत लपलाय मृत्यू? डॉ त्यागींचा 'हा' खुलासा ऐकून पायाखालची जमीन सरकेल)
ज्या लोकांनी आपल्या लहानपणी खूप जास्त मानसिक ताण (स्ट्रेस), भीती किंवा एकटेपणा अनुभवलेला असतो, ते रात्री झोपताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लँकेट किंवा चादरीचा आधार घेतात.
(नक्की वाचा : PMOS म्हणजे काय? 75 % महिलांना ठाऊकच नाही गंभीर आजाराचं धक्कादायक वास्तव, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय)
मानसशास्त्र (Psychology) काय सांगते?
मानसशास्त्रानुसार काही लोक खूप संवेदनशील आणि हळवे असतात. त्यांना छोटीशी गोष्टही मनाला लागून राहते. अशा व्यक्तींना प्रेम, आपुलकी आणि सुरक्षेची जास्त गरज असते. अशा परिस्थितीत अंगावर चादर घेतल्याने त्यांना कोणीतरी आपल्याला मिठीत घेतले आहे किंवा सुरक्षित ठेवले आहे असा आभास होतो. हेच कारण आहे की हवामान कोणतेही असो अशा लोकांना पांघरुणाशिवाय झोप येत नाही.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world