Benefits of Drinking Aam Panna: देशाच्या अनेक भागांत भीषण उष्णता आणि उष्णतेच्या लाटांचा कहर सुरूच आहे. तापमान 45 अंशांच्या पार पोहोचले आहे. अशा परिस्थितीत लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी नैसर्गिक पेयांचा डाएटमध्ये समावेश करण्यावर भर देत आहेत. यामध्ये कैरीचे पन्हे सर्वात फायदेशीर मानले जाते, हे पेय उन्हाळ्यातील अमृत म्हणूनही ओळखले जाते.
नॅशनल हेल्थ मिशनने (एनएचएम)दिलेल्या माहितीनुसार, कैरीपासून तयार केले जाणारे हे पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीराला ताजेतवाने ठेवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे पेय केवळ चवदारच नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आंबट-गोड चव असलेले हे पेय उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि शरीराला ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करते. भीषण उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
गर्मी में सबसे देसी, सबसे असरदार — 🥭 आम पन्ना!
— NHM UP (@nhm_up) June 8, 2026
कच्चे आम का यह पारंपरिक पेय शरीर को रखे तरोताज़ा, पाचन को रखे दुरुस्त।
प्राकृतिक स्वाद, गर्मी में राहत। 🌿#AamPanna #BeatTheHeat #EatRightIndia #NaturalCooling #SummerHealth #UPHealthDept #NHMUP pic.twitter.com/duSch3F6Ei
कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे (Benefits of Drinking Aam Panna)
- शरीर हायड्रेट ठेवते: उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. कैरीचे पन्हे हे पेय नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते, जे शरीरातील पाण्याचा स्तर टिकवून ठेवते.
- पचनक्रिया सुधारते: उन्हाळ्यात पोटाच्या समस्या निर्माण होणे सामान्य आहे. कैरीचे पन्ह्यामुळे पचनसंस्था मजबूत राहण्यासह भूक वाढवण्यास मदत मिळू शकते.
- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते: कैरीच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अन्य आवश्यक पोषक तत्त्व चांगल्या प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) मजबूत करू शकतात.
- उष्णतेपासून आराम: हे शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि उष्माघात, चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे या समस्यांपासूनही आराम मिळतो.
(नक्की वाचा : Hydrating Vegetables: उन्हाळ्यात खा या 6 भाज्या, पोटाचे विकार-डिहायड्रेशन एका झटक्यात होईल दूर; शरीर होईल थंड)
कैरीचे पन्हे कसे तयार करावे? (How To Make Aam Panna)
कैरीचे पन्हे तयार करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे.
- कैऱ्या पाण्यात उकळून घ्या.
- कैरीचा गर काढा.
- कैरीचा गर काढल्यानंतर त्यामध्ये पुदिना, काळे मीठ, जीरे आणि साखर किंवा गूळ एकत्र करून पन्हे तयार करून घ्या.
- कैरीचे पन्हे तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बाजारातील कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूसपेक्षा घरी तयार केलेले कैरीचे पन्हे शरीरासाठी केवळ सुरक्षितच ठरणार नाही तर पोषणतत्त्वांचाही पुरवठा होईल.
(नक्की वाचा: जीवघेण्या उष्णतेचा महाधोका! Uncompensable Heat Stress ठरणार मृत्यूचे कारण? संशोधकांचा धडकी भरवणारा खुलासा)
कैरीचे पन्हे पिण्याची योग्य वेळ
भीषण उन्हाळ्यात, सकाळ असो वा संध्याकाळ, कोणत्याही वेळी कैरीचे पन्हे प्यायल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. हे पेय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(Content Source: IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world