
Surya Grahan 2025 Daan Importance: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी आहे. हे एक आंशिक सूर्यग्रहण आहे, जे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. पण ज्या भागामध्ये हे ग्रहण दिसणार आहे, तेथेच याचा परिणाम असेल. प्राचीन काळातील मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी किंवा नंतर काही गोष्टी दान केल्याने शुभ फळ मिळण्यास आणि जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत मिळते. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टींचे दान करणे फायदेशीर ठरते, हे जाणून घेऊया...

सूर्यग्रहणामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्या? | Solar Eclipse 2025 Daan Importance | Surya Grahan 2025 Daan Importance
1. चणे दान करणे
सूर्यग्रहणादरम्यान चणे दान करणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार असे केल्यास घरामध्ये सुखशांती-समृद्धी नांदते. चणे दान केल्यास गुरू ग्रह मजबूत होतो. यामुळे शिक्षण, करिअर आणि वैवाहिक जीवन सुधारेल;असे म्हणतात.
2. गव्हाचे दान
नोकरीमध्ये अडथळे येत असतील किंवा प्रगती होत नसेल तर सूर्यग्रहणाच्या दिवशी गहू दान करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे करिअरमध्ये स्थैर्य येते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात.
(नक्की वाचा: Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्या कधी आहे? श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानची संपूर्ण विधी जाणून घ्या)
3. लाल रंगाचे वस्त्र दान करणे
लाल रंगाचे वस्त्र ग्रहणाच्या दिवशी दान केल्यास आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते, असे म्हणतात. ज्या लोकांना जीवनात वारंवार निराशेचा सामना करावा लागतोय किंवा मानसिकदृष्ट्या थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.

4. गूळ दान करणे
गूळ दान केल्यास जीवनातील आर्थिक स्थिती सुधारते, असे म्हणतात. एखाद्या ठिकाणी ज्यांचे पैसे अडकले आहेत किंवा व्यवसायात नुकसान होत असल्यास त्यांच्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो.
5. तांब्यांच्या भांड्यांचे दान
तांबे धातू हे सूर्य ग्रहाचा कारक आहे, त्यामुळे तांब्याची भांडी दान केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतात. हा उपाय केल्यास दीर्घकालीन आजारांपासून सुटका मिळते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
(नक्की वाचा : Surya Grahan 2025: सूर्यग्रहण कधी, 21 की 22 सप्टेंबर? जगभरासह 12 राशींवर काय होतील परिणाम? जाणून घ्या उपाय)
6. केळ्याचे दान करणे
ग्रहणानंतर केळी दान करणे शुभ मानले जाते. याचा जीवनातील संतुलन आणि आनंदाशी संबंध असल्याचे म्हटलं जातं. हा उपाय केल्यास कौटुंबिक समस्या सुटण्यास आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होण्यास मदत करते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world