जाहिरात

TATA Cars: टाटाच्या कार्सवर बंपर 3.35 लाखांपर्यंतचा डिस्काऊंट! 'या' मॉडेलवर आहे सर्वाधिक बचत

Tata Motors: टाटा मोटर्सने जून 2026 या महिन्यासाठी आपल्या इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) 3 लाख 35 हजार रुपयांपर्यंतच्या बंपर डिस्काउंटची घोषणा केली आहे.

TATA Cars: टाटाच्या कार्सवर बंपर 3.35 लाखांपर्यंतचा डिस्काऊंट! 'या' मॉडेलवर आहे सर्वाधिक बचत

इलेक्ट्रिक गाड्यांच्या (EV) क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीने जून 2026 या महिन्यासाठी आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक गाड्यांवर तब्बल 3 लाख 35 हजार रुपयांपर्यंतच्या जबरदस्त सवलती जाहीर केल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सकडून या महिन्यात 'ग्रीन बोनस', 'एक्सचेंज बेनिफिट', 'स्क्रॅपेज ऑफर' आणि 'लॉयल्टी बोनस' यांसारखे अनेक आकर्षक फायदे दिले जात आहेत.

Tata Curvv EV वर सर्वाधिक 3.35 लाखांची बचत

टाटा मोटर्सच्या ताफ्यातील सर्वाधिक डिस्काउंट मिळवणारी कार Tata Curvv EV ठरली आहे. या कारच्या नॉन-एक्स (non-X) व्हेरियंटवर ग्राहक पूर्ण 3 लाख 35 हजार रुपयांची मोठी बचत करू शकतात. या ऑफरमध्ये 3 लाख रुपयांचा मोठा ग्रीन बोनस आणि 30 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय, 'क्रिएटिव्ह' व्हेरियंट्सवर 2 लाख 85 हजार रुपयांपर्यंतची सूट आहे. तर 'X' व्हेरियंट्सवर 65 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत.

(नक्की वाचा-  Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)

Tata Harrier EV वर लाखोंची सूट

टाटाची प्रिमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही Harrier EV च्या सर्व व्हेरियंट्सवर या महिन्यात थेट 2 लाख 75 हजार रुपयांचा तगडा डिस्काउंट दिला जात आहे. या धमाकेदार ऑफरमध्ये 1 लाख रुपयांचा लॉयल्टी बोनस, 1 लाख रुपयांचा अतिरिक्त फायदा आणि 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे, ज्यामुळे ही प्रिमियम कार खरेदी करणे आता अधिक परवडणारे झाले आहे.

Tata Punch EV आणि Tiago EV 

मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये कमालीची लोकप्रिय असलेली Tata Punch EV च्या जुन्या व्हेरियंट्सवर 95 हजार रुपयांपासून ते 1 लाख 45 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते. यामध्ये पंच ईव्हीच्या 'LR' व्हेरियंट्सवर सर्वाधिक 1 लाख 45 हजार रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे, तर 'MR' व्हेरियंट्सवर 1 लाख 25 हजार आणि 'MR Smart' व्हेरियंटवर 95 हजार रुपयांची सूट निश्चित करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला)

दुसरीकडे, मध्यमवर्गीय ग्राहकांची आवडती कार Tata Tiago EV वर या महिन्यात 65 रुपयांपासून ते 1 लाख 45 हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट मिळत आहे. याच्या 'LR XT' व्हेरियंटवर सर्वाधिक 1 लाख 45 हजार रुपयांचा डिस्काउंट असून, त्यात 50 हजा रुपयांच्या अतिरिक्त फायद्याचाही समावेश आहे.

Tata Nexon EV वर 50 हजारांचे फायदे

टाटाची सर्वाधिक सुरक्षित आणि लोकप्रिय एसयूव्ही मानल्या जाणाऱ्या Tata Nexon EV च्या संपूर्ण रेंजवर या महिन्यात 50 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. यामध्ये 15 रुपयांचा ग्रीन बोनस आणि एक्सचेंज किंवा स्क्रॅपेजच्या अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com