जाहिरात

पाण्याच्या बाटलीमुळे कळेल तुमच्या खांद्याची ताकद, शेअर करा तुमचा अनुभव

1 Minute Water Bottle Test: डॉ. कुलकर्णी सांगतात की, ही टेस्ट जरी ऐकायला सोपी वाटत असली तर त्यामुळे तुम्हाला त्याचा बराच फायदा होऊ शकतो.

पाण्याच्या बाटलीमुळे कळेल तुमच्या खांद्याची ताकद, शेअर करा तुमचा अनुभव
1 Minute Water Bottle Test तुम्ही घरच्या घरी करू शकता ( Photo- Gemini AI)
मुंबई:

आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आरोग्य राखणे एक मोठे आव्हान बनले आहे. फक्त जिममध्ये जाऊन किंवा महागड्या उपकरणांचा वापर करूनच फिटनेस मिळवता येतो, हा समज पूर्णपणे योग्य आहे असे नाही. आपण किती तंदुरुस्त आहोत, याचा अंदाज बांधणे अनेकांना शक्य नसते.  हृदयविकारतज्ज्ञ डॉ. रवींद्र कुलकर्णी (MD, DNB, FSCAI Cardiology) यांनी एक अतिशय सोपी आणि प्रभावी फिटनेस टेस्ट सांगितली आहे, जी तुम्ही घरच्याघरी अगदी सहजपणे करू शकता.  '1 मिनिट वॉटर बॉटल टेस्ट' असं या चाचणीचे नाव आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खांद्यांची ताकद (strength) आणि सहनशक्ती (endurance) तपासू शकता. 

( नक्की वाचा: रोज ओवा खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील ? )

कशी करायची 1 Minute Water Bottle Test?

  • ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेली 1 लिटरची बॉटल घ्यायची आहे
  • एका हातात भरलेली पाण्याची बाटली घ्या.
  • आता तो हात सरळ खांद्याच्या रेषेत पुढे ताणा.
  • या स्थितीत तुम्ही किती वेळ बाटली धरून ठेवू शकता, हे मोजा.

1 Minute Water Bottle Test मुळे काय समजेल?

डॉ. कुलकर्णी यांच्या मते, तुम्ही किती वेळ बॉटल हातात धरून हात वर करून ठेवू शकता, यावरून तुमचे खांदे किती मजबूत आहे हे कळू शकतं

जर तुम्ही सहज 1 मिनिट बाटली धरून ठेवली तर याचा अर्थ तुमच्या खांद्यांची सहनशक्ती चांगली आहे आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात.

जर 30 ते 60 सेकंदात खांदा दुखायला लागला याचा अर्थ तुमच्या खांद्यांची ताकद ठीकठाक आहे. योग्य आणि नियमित व्यायामाने तुम्ही ती  सुधारू शकता.

जर 30 सेकंदांच्या आतच तुमचा खांदा दुखायला लागला आणि बाटली ठेवावीशी वाटली तर याचा अर्थ तुमचे खांदे मजबूत नाहीये आणि त्यावर तातडीने उपायाची गरज आहे.  

( नक्की वाचा: अंड्याचे पिवळे बलक खावे की खाऊ नये ?  )

या टेस्टचे इतर फायदे कोणते आहेत? 

डॉ. कुलकर्णी सांगतात की, ही टेस्ट जरी ऐकायला सोपी वाटत असली तर त्यामुळे तुम्हाला त्याचा बराच फायदा होऊ शकतो. कारण या सोप्या चाचणीमुळे तुमचे खांदे किती मजबूत आहेत हे तुम्हाला एकही रुपया खर्च न करता घरच्या घरी तुमच्या सोईनुसार तपासता येते.  खांद्यांची ताकद वाढल्यामुळे दैनंदिन कामांमध्ये, जसे की जड वस्तू उचलणे, बॅग घेऊन चालणे यांसारख्या क्रिया करताना खांद्यांवर येणारा ताण कमी होतो.इतकंच नाही तर शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठीही या टेस्टची मदत होऊ शकते. मजबूत खांदे शरीर ताठ राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. खांदे मजबूत असतील तर तुमची बसण्याची आणि उभे राहण्याची ढब सुधारते आणि पाठदुखीसारख्या समस्या कमी होतात.

टेस्ट करताना कोणती काळजी घ्यावी ?

ही टेस्ट करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या खांद्यांमध्ये आधीपासूनच वेदना (pain) किंवा दुखापत (injury) असेल, तर ही टेस्ट करू नका. हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवा, तो जास्त मागे किंवा वर नेऊ नका. जर बाटलीचे वजन अगदीच हलके वाटत असेल, तर तुम्ही वेळ वाढवून किंवा बाटलीचे वजन वाढवून ही टेस्टची काठीण्य पातळी वाढवू शकता.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com