Syphili: असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एड्स (AIDS) आणि एचआयव्हीसारख्या (HIV) रोगांचाच धोका असतो, असा समज आहे. पण, त्याहूनही एक धोकादायक आजार आहे जो थेट तुमच्या हाडांवर हल्ला करतो. या आजाराचे नाव आहे 'सिफलिस' (Syphilis), जो वेळेवर उपचार न केल्यास तो हाडांना आतून पोकळ करून टाकतो.
कशामुळे होतो आजार?
ट्रिपोनेमा पॅलिडम (Treponema pallidum) नावाच्या बॅक्टेरियामुळे हा आजार होतो. या आजारावर वेळेत उपचार केले नाहीत, तर तुमचे शरीर आतून कमकुवत होते. विशेषतः, त्यामुळे हळूहळू हाडांना हानी पोहोचते. हाडं कमजोर, आतून पोकळ बनू शकतात.
सिफलिसचे 3 टप्पे (Three Stages of Syphilis)
प्राथमिक टप्पा (Primary Stage)
संसर्गाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत, जननेंद्रिये, तोंड किंवा गुदद्वाराजवळ लहान आणि वेदनाहीन जखमा (घाव) दिसतात. या जखमा आपोआप बऱ्या होऊ शकतात, पण बॅक्टेरिया शरीरात सक्रिय राहतो.
( नक्की वाचा : 'माझ्यासोबत चल, विदेशात घेऊन जातो'; दिल्लीतील ढोंगी बाबाचा WhatsApp Chat उघड, 17 मुलींसोबत... )
दुसरा टप्पा (Secondary Stage)
काही महिन्यांत संपूर्ण शरीरावर लाल पुरळ, ताप, घसा खवखवणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसू लागतात. या टप्प्यात, संसर्ग रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पसरतो आणि हाडांपर्यंत पोहोचू शकतो.
तिसरा टप्पा (Tertiary Stage)
हा टप्पा अनेक वर्षांनंतर येतो. यामध्ये बॅक्टेरिया शरीराच्या विविध अवयवांसह हाडांनाही गंभीरपणे हानी पोहोचवतो. हा टप्पा सर्वात धोकादायक मानला जातो.
( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
सिफलिसचा हाडांवर होणारा परिणाम
कॅरिस सिका (Caries Sicca): कवटीच्या हाडांवर खड्डे आणि डाग पडतात, ज्याला वैद्यकीय भाषेत कॅरिस सिका म्हणतात. यामुळे चेहऱ्याची ठेवण (आकार) बदलू शकते.
फेमर (Femur): शरीरातील सर्वात मोठी हाड, म्हणजे मांडीचे हाड (Femur), देखील सिफलिसच्या प्रभावापासून वाचत नाही. यामध्ये खोलवर खुणा आणि कमकुवतपणा येतो, ज्यामुळे चालताना त्रास होऊ शकतो.
सतत वेदना आणि सूज: प्रभावित झालेल्या हाडांमध्ये सतत वेदना, जळजळ आणि अस्वस्थता जाणवते.
हाडांची विकृती: दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास हाडे वाकडी होऊ शकतात किंवा गंभीर परिस्थितीत तुटूही शकतात.
काय आहेत उपचार?
सिफलिस हा एक धोकादायक लैंगिक आजार आहे, जो वेळेवर उपचार न मिळाल्यास हाडांना कमकुवत आणि ठिसूळ करतो. सुदैवाने, आज यावर उपचार उपलब्ध आहेत. पेनिसिलिन (Penicillin) सारख्या अँटिबायोटिक्समुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास हाडे आणि शरीराचे गंभीर नुकसान टाळता येऊ शकते.
( स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. या विषयावर कोणतेही उपचार करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world