जाहिरात

AC Use in Monsoon: मान्सूनमध्ये AC चे 'हे' बटण दाबताच विजेचं बिल येईल कमी; अधिकांश लोकांना माहीत नाही ही ट्रिक

जर तुम्हीही मान्सूनमध्ये एसी लावत असाल तर रिमोटमधील एक छोटंसं बटण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.

AC Use in Monsoon: मान्सूनमध्ये AC चे 'हे' बटण दाबताच विजेचं बिल येईल कमी; अधिकांश लोकांना माहीत नाही ही ट्रिक

Air Conditioner Mode :  पावसाळा सुरू होताच उकाडा थोडा कमी होतो. मात्र हवेतील आर्द्रता वाढल्याने शरीरावरील चिकटपणा वाढतो. अशात अनेकजण AC चा वापर करतात. मात्र विजेचं बिल जास्त येऊ नये ही भीती असते. जर तुम्हीही मान्सूनमध्ये एसी लावत असाल तर रिमोटमधील एक छोटंसं बटण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. बऱ्याच जणांना या बटणाबद्दल माहीत नाही. उलटअर्थी हे बटण सुरू करताच तुम्ही खोली अधिक आल्हाददायक करू शकता. यातून विजेचं बिलही कमी येईल. रिमोटमधील कोणतं बटण तुमच्या विजेचं बिल कमी करेल. 

ड्राय मोड काय आहे? (What is Dry Mode)

आता येणाऱ्या अधिकांश एसीमध्ये ड्राय मोड किंवा मान्सून मोड दिलेला असतो. हा मोड विशेषत: पावसासाठी ठेवण्यात आला आहे. हे बटण ऑन केल्यास एसी हवेतील आर्द्रता कमी करतं. यामुळे खोलीतील चिकटपणा दूर होतो आणि खोली जास्त थंड न करतानाही आल्हाददायक वाटतं. 

ड्राय मोड ऑन कसा कराल? (How to Turn On Dry Mode)

जर तुमच्या एसीच्या रिमोटवर Dry किंवा Monsoon लिहिलेलं असेल तर ते बटण दाबा. काही एसीमध्ये हा मोड बटणाच्या आतही असतो. एकदा बटण दाबताच एसी आपल्या ड्राय मोडमध्ये सुरू होतो. 

नक्की वाचा - उभ्या कारमध्ये AC लावून झोपल्याने मृत्यू ओढवतो? कोण आहे सायलेंट किलर? शरीरात नेमकं काय बिघडतं?

विजेचं बिल कमी कसं होईल? (How It Saves Electricity)

ड्राय मोडमध्ये एसी प्रत्येक वेळी पूर्ण ताकदीने चालत नाही. तो मध्ये मध्ये सुरू होतो. यामुळे कमी विजेची गरज पडते. सोबतच खोलीतील आर्द्रता कमी होते. यामुळे एसी जास्त वेळ सुरू ठेवावा लागत नाही. 

फिल्टर स्वच्छ ठेवणंही आवश्यक...

पावसाळ्यात एसीचं फिल्टर लवकर खराब होतं. फिल्टर घाण झाल्याने हवा नीट येत नाही आणि एसीला जास्त काम करावं लागतं. यासाठी काही दिवसांनी फिल्टर नक्की स्वच्छ करा. यामुळे एसी चांगलं काम करेल आणि खोली लवकर थंड होईल. 

मान्सूनमध्ये 'हा' मोड का आहे फायदेशीर? 

पावसाळ्यात सर्वात त्रासदायक गोष्ट उकाडा नाही तर हवेतील आर्द्रता असते. ड्राय मोड ही आर्द्रता कमी करण्याचं काम करतं. याचमुळे खोली आल्हाददायक वाटते आणि विजेचं बिलही काही प्रमाणात कमी येऊ शकतं. 
 


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com