जाहिरात

Valentine Week Full Calendar 2026: रोज डेपासून ते किस डेपर्यंत, वाचा 7 ते 14 फेब्रुवारपर्यंतची संपूर्ण लिस्ट

Valentine Week List 2026: व्हॅलेंटाइन वीक केवळ रोमान्सपुरता मर्यादित नसतो, तर विश्वास, आपलेपण, मैत्री आणि भावनिक बंधनाचा हा उत्सव असतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे अर्थ आणि भावना वेगवेगळ्या आहेत.

Valentine Week Full Calendar 2026: रोज डेपासून ते किस डेपर्यंत, वाचा 7 ते 14 फेब्रुवारपर्यंतची संपूर्ण लिस्ट
"Valentine’s Week List 2026: व्हॅलेंटाइन वीकमधील महत्त्वाचे सात दिवस"
Canva
  • Valentine Week List 2026: व्हॅलेंटाइन वीक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो
  • Valentine Week List 2026: दरदिवशी प्रेमाचे नाते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात
  • Valentine Week List 2026: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Valentine Week Full Calendar 2026: फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणूनही ओळखला जातो. यामागील मुख्य कारण म्हणजे व्हॅलेंटाइन वीक (Valentines Week 2026). दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 13 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाइन वीक (Valentine Week 2026) साजरा केला जातो. हा संपूर्ण आठवडा कपल, मित्र-मैत्रिणी त्यांच्या नात्यातील प्रेम साजरे करतात. जगभरातील जोडपी, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्यही या व्हॅलेंटाइन वीकच्या माध्यमातून आपल्या नात्याचे बंधन साजरे करतात. व्हॅलेंटाइन वीक केवळ रोमान्सपुरता मर्यादित नसतो; तर विश्वास, आपलेपण, मैत्री आणि भावनिक बंधनाचा हा उत्सव असतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे अर्थ आणि भावना वेगवेगळ्या आहेत.  

व्हॅलेंटाइन वीकमधील महत्त्वाचे दिवस | Valentine Week 2026 List

'व्हॅलेंटाइन डे'च्या व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. याची सुरुवात 7फेब्रुवारी रोजी 'रोज डे'ने ( Rose Day 2026) होते. त्यानंतर प्रपोज डे (Propose Day 2026), चॉकलेट डे (Chocolate Day 2026), टेडी डे (Teddy Day 2026), प्रॉमिस डे (Promiss Day 2026), हग डे (Hug Day 2026) आणि किस डे (Kiss Day 2026) येतो. शेवटी, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Happy Valentine  Day 2026) साजरा केला जातो, जो आठवड्यातील सर्वात खास दिवस असतो. यानंतर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. 

रोज डे ( Rose Day 2026)7 फेब्रुवारी 2026 (7 February 2026)
 प्रपोज डे (Propose Day 2026)8 फेब्रुवारी 2026 (8 February 2026)
चॉकलेट डे (Chocolate Day 2026)9 फेब्रुवारी 2026 (9 February 2026)
टेडी डे (Teddy Day 2026)10 फेब्रुवारी 2026 (10 February 2026)
प्रॉमिस डे (Promiss Day 2026)11 फेब्रुवारी 2026 (11 February 2026)
हग डे (Hug Day 2026)12 फेब्रुवारी 2026 (12 February 2026)
किस डे (Kiss Day 2026)13 फेब्रुवारी 2026 (13 February 2026)

Valentine's Week List 2026: कोणत्या दिवशी कोणता दिवस सेलिब्रेट केला जातो? पाहा लिस्ट 

1. रोज डे (Rose Day) – 7 फेब्रुवारी 2026 

व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात गुलाबाच्या सुगंधाने होते. या दिवशी तुम्ही काहीही न बोलता आपल्या हृदयातील भावना व्यक्त करू शकता.  

रोज डे कसा साजरा करावा?: आवडत्या व्यक्तीला लाल रंगाचेच गुलाब द्यावे, असा काही नियम नाहीय. तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत मैत्रीची सुरुवात करायची असेल तर पिवळ्या रंगाचे गुलाब देऊ शकता. एखाद्या व्यक्तीचे कौतुक करायचे असेल तर गुलाबी रंगाचे गुलाब द्यावे. आपल्या पार्टनरला एक गुलाब देऊन त्यांना छान सरप्राइज देऊ शकता. 

2. प्रपोज डे (Propose Day) – 8 फेब्रुवारी 2026

ज्या लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतील, त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय खास असतो किंवा स्वतःचे नाते पुढील टप्प्यात न्यायचे असेल तर प्रपोज डे तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

प्रपोज डे कसा साजरा करावा?: तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर एखाद्या अशा ठिकाणाची निवड करा, जे तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल. कँडल लाइट डिनर किंवा वॉक करता करताही तुम्ही तुमच्या मनातील भावना आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त करू शकता. लक्षात ठेवा देखावा करण्याऐवजी तुमचा साधेपणा आणि खरेपणा जास्त महत्त्वाचा आहे.

3. चॉकलेट डे (Chocolate Day) – 9 फेब्रुवारी 2026

कडवटपणा दूर करून नात्यामध्ये गोडवा आणण्यासाठी चॉकलेट डे साजरा करा.  

चॉकलेट डे कसा साजरा करावा?: आपल्या पार्टनरला त्याच्या/तिच्या आवडीच्या चॉकलेट्सचा बॉक्स गिफ्ट करा. शक्य असल्यास तुम्ही तिच्या/त्याच्यासाठी कस्टमाइज्ड चॉकलेट बास्केट देखील तयार करू शकता. या दिवशी तुम्ही एखादा सिनेमा पाहता-पाहता आवडत्या चॉकलेट्सचा आस्वादही घेऊ शकता.  

4. टेडी डे (Teddy Day) – 10 फेब्रुवारी 2026

सॉफ्ट टॉय केवळ खेळणे नव्हे तर काळजी आणि भावनिक आधाराची भावनाही प्रदान करते.  

टेडी डे कसा साजरा करावा?: पार्टनरला एखादा टेडी बिअर गिफ्ट करा, जो पाहिल्यानंतर तुमच्या पार्टनरला तुमची आठवण येईल. शिवाय अशा प्रकारच्या गिफ्टमुळे पार्टनर सोबत नसतानाही तो/ती जवळ असल्याची जाणीव होईल. टेडी बिअरसह पार्टनरला एखादे पत्रही लिहा. 

5. प्रॉमिस डे (Promise Day) – 11 फेब्रुवारी 2026

प्रॉमिस डे म्हणजे दिखाव्याचा नव्हे तर विश्वासाचा दिवस आहे. एका मजबूत नात्याचा पाया वचनांवर अवलंबून असतो.

प्रॉमिस डे कसा साजरा करावा?: या दिवशी एकमेकांना असे वचन द्या, जे तुम्ही आयुष्यभर निभावू शकाल. उदाहरणार्थ "मी काय तुझे म्हणणं ऐकून घेईन" किंवा "कठीण काळात मी कायम तुला साथ देईन", अशा छोट्या-छोट्या प्रकारची वचनं देखील महागड्या गिफ्टपेक्षा अधिक मौल्यवान असतात. 

5. हग डे (Hug Day) – 12 फेब्रुवारी 2026

कधी-कधी ज्या गोष्टी शब्दांच्या माध्यमातून आपण व्यक्त करू शकत नाही, ते काम एका जादू की झप्पी सहज करून जाते. हा दिवस भावनिक नाते अधिक मजबूत करण्यास महत्त्वपूर्ण मानला जातो. 

हग डे कसा साजरा करावा?: आपल्या पार्टनरला मनापासून मिठी मारा. मनापासून मारलेल्या मिठीमुळे पार्टनरच्या मनामध्ये सुरक्षितत आणि तो/ती तुमच्यासाठी खास असल्याची भावना निर्माण होते. याद्वारे तुम्ही त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांच्यासोबत उभे आहात, अशीही जाणीव तुमच्या पार्टनरला होते. 

7. किस डे (Kiss Day) – 13 फेब्रुवारी 2026

'व्हॅलेंटाइन डे'पूर्वी किस डे साजरा केला जातो. हा दिवस प्रेमाच्या जवळीकतेचे आणि अतूट बंधनाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

किस डे कसा साजरा करावा?: हा दिवस तुमच्या जोडीदाराबाबत आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा आहे. यासाठी तुम्ही पार्टनरच्या कपाळाचे चुंबन घेऊ शकता. यामुळे त्यांच्या मनात सुरक्षितता तसेच तुम्ही त्यांचा आदर करता, अशी भावना निर्माण होईल. 

व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) – 14 फेब्रुवारी 2026

प्रत्येक कपलसाठी व्हॅलेंटाइन डे अतिशय महत्त्वाचा असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रेमाचा दिवस साजरा करतात.

व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करावा?: हा दिवस संस्मरणीय व्हावा यासाठी तुम्ही संपूर्ण दिवस एकत्र घालवा. एखाद्या ठिकाणी फिरण्याचा प्लान करू शकता. शक्य नसेल तर घरामध्येच एकत्र राहून एकत्रित स्वयंपाक तयार करू शकता किंवा एखादा सिनेमा पाहू शकता. एकमेकांना सुंदर भेटवस्तू द्या आणि गप्पा मारता-मारता आतापर्यंतच्या प्रवासातील आठवणींना उजाळा द्यावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com