जाहिरात

Vastu tips for money: पैसे हातात टिकत नाहीत, मग 'या' 10 वास्तु दोषांकडे लक्ष द्या, दुर्लक्ष केल्यास...

घरात पैशाची भरभराट कायम ठेवण्यासाठी खालील वास्तु नियमांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

Vastu tips for money: पैसे हातात टिकत नाहीत, मग 'या' 10  वास्तु दोषांकडे लक्ष द्या, दुर्लक्ष केल्यास...

Money related vastu dosh and remedies: पंचतत्त्वांवर आधारित वास्तुशास्त्रानुसार, जर घरातील वस्तू योग्य दिशेत आणि ठिकाणी असतील तर व्यक्तीच्या सुख-सौभाग्यात वाढ होते. याउलट, गोष्टी चुकीच्या जागी असल्यास त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करून पैसे कमावता, पण ते टिकत नाहीत किंवा तुमच्या घरातून धनाची देवी लक्ष्मी रुसून निघून गेली आहे, तर त्यांना पुन्हा आणण्यासाठी आणि घरात पैशाची भरभराट कायम ठेवण्यासाठी खालील वास्तु नियमांकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

1. घर नेहमी स्वच्छ ठेवा
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्याकडे पैसे अजिबात टिकत नाहीत. नेहमी आर्थिक चणचण असते. तर सर्वात आधी तुम्हाला आपले घर स्वच्छ आणि पवित्र ठेवावे लागेल. कारण धनाची देवी अशा ठिकाणी थांबत नाही, जिथे घाण किंवा खराब वस्तूंचा ढिगारा असतो.

2. येथे कधीही धन स्थान (पैशांची जागा) बनवू नका
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही घराच्या जिन्याखाली, टॉयलेटच्या बाजूला किंवा आग्नेय कोन्यात असलेल्या किचनसोबत धन स्थान बनवू नये. वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय कोनात ठेवलेले पैसे सहसा रोगराई किंवा इतर गोष्टींवर खर्च होतात. व्यक्तीला पैशाची कमतरता भासते.

3. दक्षिण दिशेत धन स्थान बनवू नका
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही दक्षिण दिशेत धन स्थान बनवू नये. कारण ही दिशा यमाची मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, धन स्थान नेहमी उत्तर दिशेत असले पाहिजे. कारण ही कुबेराची दिशा आहे.

4. धन स्थान कसे असावे
वास्तुशास्त्रामध्ये धन स्थानासंदर्भात काही नियम सांगितले आहेत. जसे की धन स्थान नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. तिथे कधीही कोळीष्टके किंवा घाण नसावी. धन स्थानावर जुनी बिले किंवा इतर अनावश्यक वस्तू चुकूनही ठेवू नका, कारण हा एक मोठा वास्तु दोष मानला जातो.

5. या कारणांमुळे लक्ष्मी रुसून जाते
वास्तुशास्त्रानुसार, तुमचे धन स्थान किंवा पर्स कधीही अस्वच्छ हातांनी किंवा अपवित्र अवस्थेत स्पर्श करू नये. अन्यथा धनाची देवी लक्ष्मी रुसून निघून जाते. त्याचप्रमाणे धन स्थानात कधीही फाटलेल्या नोटा किंवा खोटे नाणे ठेवू नयेत.

6. लगेच टपकणारा नळ दुरुस्त करा
सनातन परंपरेत पाण्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ज्या घरात नळातून किंवा इतर माध्यमातून पाण्याची नासाडी होते, तिथून धनाची देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते अशी मान्यता आहे. पाण्याच्या गळतीमुळे निर्माण होणारा वास्तु दोष व्यक्तीचे पैसे विनाकारण खर्च करवतो. जर व्यक्तीने या वास्तु दोषाकडे लक्ष दिले नाही, तर एक दिवस तो कंगाल होतो.

7. मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तु दोष दूर करा
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा आणि तुमच्या पैशाचा जवळचा संबंध आहे. कारण याच मार्गाने माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. त्यामुळे आपला मुख्य दरवाजा नेहमी मंगल चिन्हांनी सजवून स्वच्छ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा तुटलेला असतो, त्यांना अनेकदा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो.

8. घरात झाडू कुठे ठेवावा
हिंदू धर्मात घराच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुनुसार, झाडू अशा ठिकाणी ठेवू नये जिथे तो पायांखाली येईल. त्याचप्रमाणे झाडू चुकूनही धन स्थानाच्या अगदी जवळ किंवा किचनमध्ये ठेवू नये. झाडू कोणत्याही उघड्या ठिकाणी ठेवण्याऐवजी पश्चिम दिशेत लपवून ठेवावा जेणेकरून कोणाची नजर त्यावर पडणार नाही. संध्याकाळ झाल्यावर झाडू लावू नये अशीही एक मान्यता आहे.

9. घरात खराब घड्याळे ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही बंद घड्याळे ठेवू नयेत. वास्तुनुसार, बंद पडलेली खराब घड्याळे नकारात्मक उर्जेचे कारण बनतात. तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करतात. त्यामुळे, आपले घड्याळ एकतर दुरुस्त करून घ्या किंवा लगेच घरातून बाहेर काढून टाका.

10. ईशान्य कोना नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, ज्या लोकांच्या घरात ईशान्य कोना (उत्तर-पूर्व दिशा) उंच असतो, त्यांच्या घरात पैशाच्या आगमनाचा प्रवाह कमी होतो. अशा घरांमध्ये पैशांची चणचण नेहमीच दिसून येते. ईशान्य कोन नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com