
Vasubaras 2025 Date And Time: हिंदू धर्मातील वसुबारस या सणास मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा सण मुख्यतः महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण गोवत्स द्वादशी या नावानंही साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील वद्य द्वादशी तिथीला वसुबारस साजरी केली जाते. यंदा वसुबारस कधी आहे? कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी? पूजा कशी करावी? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
वसुबारस 2025 कधी आहे? | When Is Vasubaras | Govatsa Dwadashi 2025| Vasubaras Kadhi Ahe
यंदा 17 ऑक्टोबर (शुक्रवार) 2025 रोजी वसुबारस आहे.
वसुबारस 2025 तिथी आणि मुहूर्त | गोवत्स द्वादशी 2025 तिथी आणि मुहूर्त | Vasubaras 2025 Tithi And Muhurat | Govatsa Dwadashi 2025 Tithi And Muhurat
- द्वादशी तिथीस 17 ऑक्टोबर सकाळी 11:12 वाजता प्रारंभ होणार आहे.
- द्वादशी तिथी 18 ऑक्टोबर दुपारी 12:18 वाजता समाप्त होणार आहे.
- पूजनाचा मुहूर्त (प्रदोष काळ) : संध्याकाळी 6.14 वाजेपासून ते रात्री 8.42 वाजेपर्यंत आहे. यानुसार पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 28 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे.
वसुबारसची पूजा कशी करावी? (Vasu Baras 2025 Puja Vidhi)
- वसुबारसच्या दिवशी सवत्स गायीची म्हणून गायीसह वारसाची पूजा करण्याची परंपरा आहे.
- तुमच्या घरामध्ये गाय-वासरू असेल तर त्यांना आंघोळ घालून त्यांचे औक्षण करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि फुले त्यांना अर्पण करा.
- तुमच्याकडे गाय वासरू नसतील तर एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन पूजा करू शकता. तेही शक्य नसेल तर गाय आणि वासराच्या मातीच्या मूर्तीची पूजा करावी.
- संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजा-आरती करावी.
- गायीला हिरवा चारा, चणे, मोड आलेले मूग आणि गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा.
वसुबारस पूजेच्या मांडणीचा व्हायरल व्हिडीओ | Vasu Baras 2025 Puja Viral Video
डॉ. रुचा पै यांनी वसुबारस सणाचे सांगितलेले धार्मिक महत्त्व वाचा |Vasu Baras 2025 Significance
वसुबारसच्या दिवशी या दोन गोष्टी करुन पाहा
ज्योतिषशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या आसपास गोशाळा असेल तर तेथे तुम्हाला मदत करता आली तर करावी. कारण काही लोक खूप नि:स्वार्थ मनाने गाय आणि वासरांचे जीव वाचवतात. दुसरे म्हणजे एखाद्या गरजवंतांना तुम्ही काही फराळ किंवा काही अन्य गोष्ट देऊ शकत असाल तर तशी मदत करावी.
(नक्की वाचा: Diwali 2025 Calendar: धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत, दिवाळी सणाचे संपूर्ण कॅलेंडर, शुभ मुहूर्त मिळवा एका क्लिकवर)
वसुबारस स्पेशल रांगोळी डिझाइन | Vasubaras 2025 Rangoli Design
(नक्की वाचा: Dhanteras 2025: धनत्रयोदशीला पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त आणि लक्ष्मीमाता-कुबेर देवतेचा विशेष मंत्र जाणून घ्या)
शुभ वसुबारस 2025
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world