
Flat Tummy Exercise: सी-सेक्शन डिलिव्हरीनंतर कित्येक महिला सुटलेल्या पोटाच्या तक्रारीमुळे त्रासलेल्या असतात. कारण स्ट्रेच मार्कसह सुटलेल्या पोटाचा भाग दिसायलाही चांगला दिसत नाही. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत आहत का? तर पाच सोप्या टिप्स फॉलो करुन तुमचेही सुटलेले पोट सपाट होण्यास मदत मिळू शकते.
1. व्यायाम आणि योग
व्यायाम आणि योगासनांचा नियमित सराव केल्यास कित्येक आजारांपासून सुटका होऊ शकते. संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत मिळेल. सी-सेक्शन डिलिव्हरीनंतर महिलांनी नियमित योगासनांचा सराव केला तर सुटलेले पोट सपाट होण्यास मदत मिळू शकते. योगासने आणि व्यायामामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतील डिलिव्हरीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम-योग करण्यास सुरुवात करावी.
2. बेली बाइंडिंग
बाळ जन्मल्यानंतर कित्येक महिला कापडाने त्यांचे पोट बांधतात. पोटाचा भाग पूर्ववत करण्यासाठी वापरली जाणारी ही एक पारंपरिक पद्धत आहे. यामुळे पोटाला आधार मिळतो आणि सुटलेले पोट आतमध्ये जाते.
3. पौष्टिक आहार
डिलिव्हरी झाल्यानंतर डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचाच समावेश करावा. फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास वजन वाढणार नाही. पण गोड, तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होऊ लागतात.
4. पोटाचा मसाज
प्रसूतीच्या दोन आठवड्यानंतर पोटाचा हलक्या हाताने मसाज करावा. योग्य पद्धतीने मसाज केल्यानंतरही पोटाचा भाग सपाट होण्यास मदत मिळू शकते.
(नक्की वाचा: Home Remedies For Gas: पोटातील गॅस किरकोळ आजार नाही, शरीराच्या आत तयार होईल मोठा धोका)
5 .ओवा आणि जिऱ्याचे पाणी
ओवा आणि जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. याशिवाय तुम्ही ग्रीन टी देखील पिऊ शकता. यातील पोषणतत्त्वांमुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतील.
(नक्की वाचा: Ginger Benefits: सलग 7 दिवस आले खाल्ल्यास काय होईल? डॉक्टरांनी स्टेप बाय स्टेप सांगितली माहिती)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world