जाहिरात

Jwari vs Nachani Roti: ज्वारी की नाचणी, वेटलॉससाठी कोणती पोळी खावी?

Jwari vs Nachani Roti: वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या पिठाच्या पोळीचा समावेश करावा?

Jwari vs Nachani Roti: ज्वारी की नाचणी, वेटलॉससाठी कोणती पोळी खावी?
"Jwari vs Nachani Roti: वजन कमी करण्यासाठी कोणती पोळी खावी?"
Canva

Jowar vs Ragi Roti | Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावं आणि काय टाळावे, यावरुन बहुतांश लोकांचा गोंधळ उडतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील डाएटमधून भात, गहू वर्ज्य करण्याचा विचार करताय का? तर या लेखाद्वारे दोन पौष्टिक पर्याय आपण जाणून घेऊया. ज्वारी आणि नाचणीचा डाएटमध्ये समावेश केल्यास वजन कमी होण्यासह आरोग्यासही असंख्य फायदे मिळतील.

ज्वारी खाण्याचे फायदे | Jowar Benefits | Jowar Roti Benefits | Jwari Roti Benefits

  • ज्वारीच्या पोळीद्वारे शरीराला प्रोटीनचा पुरवठा होईल. स्नायूपेशी देखील मजबूत होतील, वजन कमी होण्यास मदत मिळेल. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.  
  • ज्वारीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तशर्करेची पातळी अचानक वाढत नाही तर शरीरातील ऊर्जा टिकून राहते. वारंवार लागणाऱ्या भूकेच्या समस्येतून सुटका मिळते.   
  • ज्वारीतील लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते तसेच आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.  
  • जलदगतीने वजन कमी करायचं असेल तर डाएटमध्ये ज्वारीच्या पोळीचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. 

नाचणी खाण्याचे फायदे | Ragi Benefits | Ragi Roti Benefits | Nachani Roti Benefits

  • कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे नाचणी. नाचणीच्या पोळीमुळे शरीराचे वजन कमी होतेच शिवाय शरीराची हाडे देखील मजबूत होतात. 
  • ज्वारीच्या तुलनेत नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. परिणामी वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. 
  • नाचणीतील ग्लायसेमिक इंडेक्स सर्वाधिक कमी असते, यामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. म्हणून मधुमेहग्रस्तांना नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. 
  • नाचणीमध्ये अशा काही अमिनो अ‍ॅसिड्सचा समावेश आहे, जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही.   

(नक्की वाचा: Side Effects Of Eating Wheat: गव्हाची पोळी रोज खाताय? यातील एक प्रोटीन आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

नाचणी की ज्वारी, वजन कमी करण्यासाठी कोणत्या पिठाची पोळ खावी? | Weight Loss Roti 

  • तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार दोन्ही पोळींचा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता.  
  • एक दिवस ज्वारीची दुसऱ्या दिवशी नाचणीची पोळी असा आहार तुम्ही फॉलो करू शकता. 
  • किंवा दोन्ही धान्य समसमान प्रमाणात मिक्स करून त्यापासून तयार केलेल्या पोळीचे सेवन करावे.  

(नक्की वाचा: Multigrain Roti Benefits: मल्टिग्रेन पोळी खाण्याचे 7 जबरदस्त फायदे)

ज्वारी-नाचणीबाबतचे तुमच्या मनातील प्रश्न (FAQ)

1. ज्वारी की नाचणी, कोणत्या पोळीमुळे वजन पटकन होईल कमी?

ज्वारीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त तर कॅलरीचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे ज्वारीच्या पोळीमुळे वजन पटकन कमी होईल. पण हाडे मजबूत ठेवायची असतील नाचणीचा डाएटमध्ये समावेश करावा.

2. मधुमेहग्रस्तांसाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

बाजरी आणि नाचणी दोन्हीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी आहे. पण तुलनेने नाचणीचे GI सर्वाधिक कमी आहे. परिणामी रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणी खाणे फायदेशीर ठरेल. 

3. मी रोज नाचणी किंवा ज्वारीची पोळी खाऊ शकतो का? 

नाचणी आणि ज्वारी दोन्ही धान्य ग्लुटेन फ्री आहेत आणि फायबरचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मर्यादित स्वरुपात पोळ्यांचे सेवन करावे. 

4. नाचणी की ज्वारी कोणत्या पोळीमुळे पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते?

नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. 

5. वजन घटवण्यासाठी नाचणी-ज्वारीचे पीठ मिक्स करू शकतो का?

ज्वारी आणि बाजरीचे पीठ समसम प्रमाणात एकत्रित करा. या दोन पिठांपासून तयार केलेली पोळी खाल्ल्यास शरीराला प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचा पुरवठा होईल.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com