ओला इलेक्ट्रिकने आपल्या Gig आणि S1 Z स्कूटरची नवीन रेंज भारतात लॉन्च केली आहे. Ola Gig, Ola Gig+, Ola S1 Z आणि Ola S1 Z+ हे नवीन मॉडेल्स रेंजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. यासोबतच त्यांचे बुकिंगही सुरू झाली असून केवळ 499 रुपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये रिमुव्हेबल बॅटरी पॅक दिला आहे. ज्यामुळे त्यांचे चार्जिंग आणखी सोपे होणार आहे. Gig आणि S1 Z सीरिजची डिलिव्हरी एप्रिल 2025 आणि मे 2025 पासून सुरू होईल.
ओला Gig (किंमत: 39,999 रुपये)
ओला गिग ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी शॉर्ट राइड्ससाठी डिझाइन केलेली आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने 1.5 kWh क्षमतेचा रिमूव्हेबल बॅटरी पॅक दिला आहे. असा दावा केला जातो की ही स्कूटर एका चार्जवर 112 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल. ही स्कूटर B2B व्यवसायासाठी योग्य मानली जाते.
ओला गिग+ (किंमत: 49,999 रुपये)
ओला गिग+ स्कूटरमध्ये रेंज थोडी जास्त मिळते. ही स्कूटर जड पेलोडसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या कामगारांसाठी डिझाइन करण्यात आली होती. ही स्कूटर 1.5 kWh क्षमतेच्या रिमुव्हेबल सिंगल/ड्युअल बॅटरीसह सादर करण्यात आली आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 45 किमी/तास आहे. या स्कूटरची सिंगल बॅटरी 81 किमीची रेंज देते, म्हणजेच दोन बॅटरीसह ही स्कूटर 157 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.
ओला S1 Z (किंमत: 59,999 रुपये)
S1 Z इलेक्ट्रिक स्कूटर वैयक्तिक वापरासाठी तयार करण्यात आली आहे. या स्कूटरला 1.5 kWh रिमुव्हेबल ड्युअल बॅटरी मिळते, ज्याची IDC-प्रमाणित श्रेणी 75 किमी आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ही स्कूटर 1.8 सेकंदात 0-20 किमी प्रतितास आणि 4.8 सेकंदात 0-40 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.
Ola S1 Z+ (किंमत: 64,999 रुपये)
Ola S1 Z Plus ही या रेंजमधली सर्वात महागडी स्कूटर आहे. पण तिचे फीचर्स आणि रेंजही चांगली आहे. हाय पेलोड क्षमता आणि स्टोरेजची सुविधा आहे. ही स्कूटर वैयक्तिक तसेच हलक्या व्यावसायिक वापरासाठी वापरली जाऊ शकते. यात 1.5 kWh क्षमतेची रिमुव्हेबल ड्युअल बॅटरी आहे. ज्याची IDC-प्रमाणित श्रेणी 75 किमी आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी प्रति तास असणार आहे. यात एलसीडी डिस्प्ले आणि फिजिकल की आहे. याशिवाय यामध्ये सर्वात मोठा 14 इंचाचा टायर वापरण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world