अलका याज्ञिक यांना झालेला कानाचा आजार नेमका काय आहे? लक्षणे काय आहेत?

सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस (SNHL) हा एक दुर्मिळ प्रकारचा श्रवणशक्ती दोष आहे आहे. जो कानाच्या आतील लहान पेशी किंवा कानापासून मेंदूला जोडणाऱ्या मज्जातंतूला इजा झाल्यास उद्भवतो.

Advertisement
Read Time: 2 mins

बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांना ‘सेन्सरी न्यूरल हियरिंग लॉस' या गंभीर आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे अलका याज्ञिक यांना दोन्ही कानाने ऐकू येत नाहीय. त्यांना स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट लिहत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्या यावर उपचार घेत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस या आजाराबाबत चेंबूर येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल्सचे कान-नाक-घसा विकाल तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले यांनी म्हटलं की, काही आजारांमुळे आपली श्रवण क्षमता कमी होते. मात्र हे अचानक न घडता हळूहळू घडून येते. परंतु अचानकच ऐकू न येणे ही एक गंभीर समस्या समजली जाते आणि त्याला ‘सेन्सरी न्यूरल हियरिंग लॉस' असे म्हटले जाते. अशा अचानक उद्भवलेल्या स्थितीमध्ये व्यक्तीला अचानक ऐकू येणे बंद होते. या आजारावर प्राथमिक अवस्थेतच उपचार घेणे महत्वाचे आहे. निदान व उपचारास विलंब केल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.

(नक्की वाचा- गायिका अलका याज्ञिकला दुर्मिळ आजार, दोन्ही कानांवर गंभीर परिणाम)

सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस (SNHL) हा एक दुर्मिळ प्रकारचा श्रवणशक्ती दोष आहे आहे. जो कानाच्या आतील लहान पेशी किंवा कानापासून मेंदूला जोडणाऱ्या मज्जातंतूला इजा झाल्यास उद्भवतो. जन्मजात बहिरेपणा हा अनुवांशिक कारणांमुळे आणि बाळाच्या जन्मादरम्यान आईद्वारे प्रसारित होणारे टॉक्सोप्लाझोसिस, रुबेला आणि नागीण यांसारख्या रोगांमुळे होते. 

वृद्धत्व, स्वयं-प्रतिकार रोग, मोठा आवाज, काही ठराविक औषधे, कानाला किंवा डोक्याला झालेली दुखापत आणि कॅरोटिड आर्टरी स्टेनोसिस सारख्या रक्तवाहिन्यांचे आजार यामुळे लहान मुले किंवा प्रौढांना सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस (SNHL) समस्या विकसित होऊ शकते. परिधीय धमनी विकार आणि एन्युरिझम देखील यास कारणीभूत ठरतात. एका कानात काही आवाज खूप मोठ्याने ऐकू येणे, काहींना गोंगाटाच्या ठिकाणी ऐकण्यात अडचण येते, दोन किंवा अधिक लोक बोलत असताना तुम्हाला संभाषणास समस्या येतात आणि "स" किंवा "थ" सारखे आवाज ऐकू न येण्याची समस्या उद्भवते. योग्य निदानासाठी आणि वेळीच उपचाराकरिता तुम्हाला ही लक्षणे दिसू लागल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ञ किंवा ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घेणे गरजचे आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - कोणत्या 3 अ‍ॅपमुळे नागपुरचा ब्रम्होस इंजिनियर पाकच्या जाळ्यात अडकला? मोठी अपडेट समोर)

सेन्सोरिनरल नर्व्ह हियरिंग लॉस  विकसित होण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्वाचे आहे. कॉन्सर्ट किंवा पार्ट्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या वातावरणात ईअर प्लग किंवा नॉइज कॅन्सल हेडफोन्सचा वापर करणे, दीर्घकाळासाठी इअरफोन्स किंवा एअरपॉडचा वापर मर्यादित करणे, टीव्ही आणि म्युझिक सिस्टीमचा आवाज मर्यादित राखणे आणि आवश्यक ती सुरक्षितता बाळगुन यास प्रतिबंध करता येऊ शकतो. यासाठी नियमित कानांची तपासणी करणे, श्रवणविषयक क्षमतेची तपासणी करणे हे तुमची श्रवण क्षमता निरोगी राखण्यास मदत करते.

Topics mentioned in this article