जाहिरात
This Article is From May 10, 2024

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? तर मग ही बातमी नक्की वाचा

साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहीले जाते. त्यामुळे सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. पण सोन्याचे दर सध्या गगनाला भिडलेले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? तर मग ही बातमी नक्की वाचा
जळगाव:

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहीले जाते. त्यामुळे सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. पण सोन्याचे दर सध्या गगनाला भिडलेले आहे. आज अक्षय्य तृतीया त्यामुळे आजचा भाव काय याकडे सर्वांचेच लक्ष आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्या - चांदीच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  तर चांदीच्या भावात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्ण नगरीत आज ( शुक्रवारी ) सोन्याचे भाव 72 हजार 300 रुपये तर जीएसटी सह सोन्याचे भाव 74 हजार 470 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे भाव 84 हजार 500 रुपये आणि जीएसटी सह 87 हजार 30 रुपयांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शक्य नाही? मग विकत घेऊ शकता या शुभ गोष्टी 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र, यंदा सोन्यानं उच्चांकी दर गाठल्याने यावर्षी सोने खरेदी कडे सर्वसामान्य पाठ फिरवता की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, याउलट चित्र आज जळगाव आणि धुळे शहर बघायला मिळालं आहे. शहरातील सराफी पेढ्यांवर ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत सोन्याचा दर हा 74 हजार रुपये आहे. हा दर दिवाळी पर्यन्त 80 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. 

हेही वाचा - Akshaya Tritiya 2024: नातेवाईक-मित्रपरिवाराला अक्षय्य तृतीयेच्या पाठवा या खास शुभेच्छा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com