जाहिरात

Ram Navami Date 2025: रामनवमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर

Ram Navami 2025: रामनवमीच्या दिवशी पूजा आणि रामचरितमानसचे पठण केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास आणि सुखसमृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळेल. यंदा रामनवमी कधी साजरी करण्यात येणार आहे? याची माहिती जाणून घेऊया सविस्तर...

Ram Navami Date 2025: रामनवमी कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजा विधीसह सर्व माहिती मिळेल एका क्लिकवर
"Ram Navami 2025 Date: रामनवमी कधी साजरी केली जाणार?"

Ram Navami 2025 Date:  रामनवमी (Ram Navami) हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या घरी रामाचा जन्म झाला होता, असे म्हणतात. रामनवमीच्या दिवशी रामाची पूजा केल्यास आणि रामचरितमानसचे पठण केल्यास सर्व समस्या दूर होण्यासह जीवनामध्ये सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे. यंदा रामनवमी कधी आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घेऊया सविस्तर... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामनवमी कधी आहे ? (Ram Navami Kadhi 2025)

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी 5 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7.26 वाजता सुरू होणार असून 6 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7.22 वाजेपर्यंत असणार आहे. उदयातिथीनुसार रामनवमी उत्सव 6 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. 

(नक्की वाचा:  Happy Ram Navami 2025: श्री रामाच्या आशीर्वादाने जीवन होईल सुखी! रामनवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा)

रामनवमीच्या दिवशी पूजा कशी करावी?( Ram Navami Puja Vidhi)

  • रामनवमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. 
  • स्वच्छ पोशाख परिधान करावा. 
  • यानंतर प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक करावा. 
  • यानंतर सर्व मूर्तींवर चंदन, फुल, हळदकुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दिवा लावून पूजा करावी आणि नैवेद्यही अर्पण करावे. 
  • श्रीरामचरितमानस, सुंदरकांड किंवा रामरक्षा स्त्रोत्राचे पठण करावे.  
  • पूजेच्या शेवटी प्रभू श्रीरामाची आरती करावी आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. 
  • गरजूंना अन्नदान करावे; असे केल्यास प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळेल, असे म्हणतात. 
  • कामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी श्रीराम आणि सीतामातेला हळद-कुंकू आणि चंदन अर्पण करावे. 
  • तसेच दीर्घकाळापासून आजाराचा सामना करत असाल तर हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करू करावे. 

(नक्की वाचा: Parenting Tips: रामायणातील या 5 गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा, जीवनामध्ये होईल मोठा फायदा) 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: