जाहिरात

Wardha News: भाजपच्या माजी खासदाराला राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

Wardha News : . वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवेश नाकारल्यानंतर देवळीतील गावकऱ्यारी संताप व्यक्त केला आहे. 

Wardha News: भाजपच्या माजी खासदाराला राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

निलेश बंगाळे, वर्धा

Wardha News : वर्ध्यात भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याची घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवेश नाकारल्यानंतर देवळीतील गावकऱ्यारी संताप व्यक्त केला आहे. 

रामदास तडस सकाळी 10 वाजता देवळीच्या राम मंदिरात सपत्नीक पूजा करायला गेले होते. तडस सपत्निक पूजेसाठी तडस हे गर्भगृहात शिरत असताना पुजाऱ्याने त्यांना रोखल्याची माहिती आहे.  देवळीतील राम मंदिरातील ही घटना वाईट अनुभव घेणारी आहे, असं  रामदास तडस यांनी म्हटलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच राहा, असं मंदिरातील पुजाऱ्याने रामदास तडस यांना सुनावले.   पवित्र धोतर घातलेले नाही, जानवे नाही. नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही. बाहेर निघा वाद नको, असं देखील पुजाऱ्याने म्हटलं. पुजाऱ्याचे बोलणे ऐकून रामदास तडस नाराज झाले. मात्र वाद नको म्हणून त्यांना माघार घेतल्याची माहिती आहे. 

(नक्की वाचा-  Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)

रामदास तडस यांनी याबाबत म्हटलं की, "मी व माझी पत्नी इतर सहकारी श्रीराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो असता, तेथील पूजा करणारे पुजारी यांनी मला पूजा करण्यासाठी रोखले. मी विचारणा केली असता आपण जानवे व सोवळे परिधान केले असेल तर तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी जाता येईल असे सांगण्यात आले. मी त्यांना म्हटले की, आम्ही चाळीस वर्षांपासून दर रामनवमीला इथे येतो. हे बरोबर नाही. एकीकडे रामावर माझी श्रद्धा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम भक्तांसाठी भव्य रामाचे मंदिर उभारले आणि दुसरीकडे तुम्ही आम्हाला मनाई करता, हे योग्य नाही."

(नक्की वाचा - Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!)

पुढे रामदास तडस म्हणाले, "मी त्यांना विचारले तुम्ही कसे गेले, त्यावर ते म्हणाले मी सोवळे घातले आहे. मला वाटते हे त्यांचे बोलणे संयुक्तिक नव्हते, त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी त्याचा निषेध केला. कार्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तेव्हा मी म्हटले आज रामनवमीचा दिवस आहे. आज संघर्ष बरोबर नाही. मी कार्यकर्त्यांना समजावले, आमच्या आमदारांनी सुद्धा या पुजाऱ्याला समज दिली. या देवस्थानाची दोनशे एकर जमीन आहे. मात्र तरी देखील सर्व गोष्टी आम्ही आमच्या पैशांमधून मंदिरासाठी करतो, अशी त्यांची तिथे मक्तेदारी चालते."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: