जाहिरात

Mahindra XUV 7XO vs Tata Safari: महिंद्रा SUV की टाटा सफारी? या कारमध्ये आहेत फॉर्च्युनरपेक्षाही दमदार फिचर्स

नुकतीच लॉन्च झालेली नवी महिंद्रा XUV 7XO आणि दुसरीकडे आहे मजबूत टाटा सफारी..या दमदार SUV पैकी कोणती कार सर्वात चांगली ठरेल? असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल, तर या दोन्ही कारबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या..

Mahindra XUV 7XO vs Tata Safari: महिंद्रा SUV की टाटा सफारी? या कारमध्ये आहेत फॉर्च्युनरपेक्षाही दमदार फिचर्स
Mahindra XUV 7XO vs Tata Safari
मुंबई:

Mahindra XUV 7XO vs Tata Safari Features : भारतात नवनवीन लक्झरी कार खरेदी करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समजते. अशातच दोन एसयूव्ही SUV कारने मार्केट जाम केलं आहे. एका बाजूला आहे मिड-सायकल अपडेटसह लॉन्च झालेली नवी महिंद्रा XUV 7XO आणि दुसरीकडे आहे मजबूत टाटा सफारी..या दमदार SUV पैकी कोणती कार सर्वात चांगली ठरेल? असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल, तर या दोन्ही कारबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. 

लुक आणि स्टाईल

टाटा सफारीची रुंदी (1922 mm) आणि उंची (1795 mm)आहे. यामुळे ती कार रस्त्यावर खूप दमदार,मोठी आणि अलिशान दिसते. या कारच्या तुलनेत,नवी XUV 7XO आता आधीपेक्षा अधिक शार्प आणि मॉडर्न बनली आहे. यामध्ये  नवीन LED DRLs,हेक्सागोनल लाइटिंग सिग्नेचर आणि पहिल्यांदाच यामध्ये 19-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत.ज्यामुळे कार स्पोर्टी आणि आकर्षक लुकमध्ये दिसत आहे. 

नक्की वाचा >> महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा

कारची वैशिष्ट्ये काय?

दोन्ही गाड्यांमध्ये जबरदस्त फिचर्स आहेत आणि ऐकमेकिंना टक्कर देण्याऱ्या आहेत. महिंद्रा XUV 7XO मध्ये कोस्ट-टू-कोस्ट ट्रिपल स्क्रीन आहे. यासोबतच ChatGPT आणि Alexa सपोर्ट, 16-स्पीकर हरमन कार्डन सिस्टम, आणि प्रवाशांसाठी स्वतंत्र डिस्प्ले असे हाय-टेकची सुविधाही आहे.तर टाटा सफारीमध्ये पावर्ड टेलगेट,व्हेंटिलेटेड सीट्स आणि कूल्ड स्टोरेज यांसारखे प्रॅक्टिकल फीचर्स उपलब्ध आहेत.मात्र, XUV प्रमाणे डेडिकेटेड पॅसेंजर डिस्प्ले न दिल्याने या कारची स्टाईल थोडी बदलते. 

पॉवर आणि परफॉर्मन्स

महिंद्रा XUV 7XO 

2.0L टर्बो पेट्रोल (200 PS)
2.2L डिझेल (185 PS)
असे इंजिन पर्याय दिले आहेत.

नक्की वाचा >> Video : शांतपणे मटार सोलणाऱ्या गर्लफ्रेंडवर शिखर धवन संतापला, ओरडत ओरडत म्हणाला, "माझं आयुष्य बरबाद.."

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात AWD (ऑल-व्हील-ड्राइव्ह) चा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे ती खराब रस्त्यांवर सहज ड्राईव्ह करू शकते. तर टाटा सफारीमध्ये फक्त 2.0L क्रायोटेक डिझेल इंजन (170 PS) मिळते.यात वेगवेगळे टेरेन मोड्स दिले आहेत,पण ही SUV फक्त फ्रंट-व्हील-ड्राइव्ह (FWD) आहे.

सेफ्टी (सुरक्षा)

सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही SUV ने कोणताही बदल केलेला नाही.दोन्ही गाड्यांना 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मिळाली आहे.XUV 7XO आता लेव्हल 2+ ADAS आणि 540-डिग्री कॅमेरासह येते, तर टाटा सफारीही
उत्कृष्ट ADAS फीचर्स आणि मजबूत बिल्ड क्वालिटीसाठी ओळखली जाते.

किंमत

महिंद्रा XUV 7XO ची किंमत ₹13.66 लाख पासून सुरू होते आणि टॉप मॉडेल ₹24.92 लाखपर्यंत आहे. दुसरीकडे, टाटा सफारीची सुरुवातीची किंमत जवळपास ₹13.29 लाख आहे आणि टॉप-एंड व्हेरिएंट ₹25.96 लाखपर्यंत असू शकते. जर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान,जबरदस्त परफॉर्मन्स आणि AWD ची ताकद हवी असेल,तर महिंद्रा XUV 7XO एक जबरदस्त पर्याय आहे. पण जर तुम्हाला रॉयल लुक,अप्रतिम राइड कम्फर्ट आणि पावर्ड टेलगेटसारख्या प्रॅक्टिकल फीचर्ससह एक क्लासिक SUV हवी असेल,तर टाटा सफारी आजही स्वतःचे स्थान भक्कमपणे टिकवून आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com