- विक्सीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण बिअरच्या तुलनेत अधिक असून यकृतावर थेट परिणाम होऊ शकतो
- बिअरमध्ये अल्कोहोल कमी असून जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाचा घेर वाढण्याचा धोका असतो
- विक्सी रक्तात वेगाने मिसळते आणि मेंदूवर ताण निर्माण करते, ज्यामुळे व्यसन लागण्याची शक्यता वाढते
आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कोणतेही मद्य शरीरासाठी चांगले नसते. मात्र, विस्की आणि बिअर यांच्यातील मुख्य फरक 'अल्कोहोल'च्या प्रमाणात आहे. विस्कीमध्ये साधारणपणे 40% ते 50% अल्कोहोल असते. तर बिअरमध्ये हे प्रमाण केवळ 4% ते 8% असते. विस्की कमी प्रमाणात केलेले सेवनही यकृतावर (Liver) थेट परिणाम करू शकते, कारण ते 'कॉन्सन्ट्रेटेड' स्वरूपात असते. याबाबत डॉक्टर वेळोवेळी सल्ले देत असतात. त्यांच्यानुसार सर्वात आरोग्यासाठी घातक काय हे आपण पाहाणार आहोत.
बिअरला अनेकदा 'लिक्विड ब्रेड' म्हटले जाते. एका कॅन बिअरमध्ये साधारणपणे 150 कॅलरीज असतात. जास्त बिअरमुळे पोटाचा घेर वाढतो, ज्याला आपण 'बिअर बेली' म्हणतो. याउलट, विक्सीमध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात, पण ती घेताना सोबत वापरले जाणारे शीतपेय किंवा सोडा शरीरातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरतो. अनेकांना वाटते की बिअर हलकी आहे, म्हणून ती सुरक्षित आहे. पण तज्ज्ञ सांगतात की, 2 ग्लास बिअर पिणे हे 1 पेग विस्की घेण्यासारखेच आहे.
नक्की वाचा - D Mart News: डी मार्टचा जानेवारी धमाका! काय आहेत विशेष ऑफर?, ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊस
विस्की प्यायल्याने ती रक्तात वेगाने मिसळते आणि मेंदूवर ताण पडतो. बिअर पिणाऱ्यांना वारंवार लघवीला जावे लागल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. दीर्घकाळ विचार केला तर विस्कीमुळे यकृताचे आजार वेगाने बळावतात. मात्र, बिअरचे अतिसेवन किडनीवर ताण निर्माण करते. संशोधनानुसार, हँगओव्हरचा विचार केला तर विस्कीमध्ये असलेल्या 'कॉन्जेनर्स'मुळे डोकेदुखी अधिक तीव्र असते.
बिअरमध्ये असलेले 'प्युरीन्स' रक्तातील युरिक ॲसिड वाढवतात, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. विक्सीमुळे पोटात ॲसिडिटी वाढते आणि पचनसंस्था बिघडते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर बिअर हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो.डॉक्टर ही याबाबत सल्ला देतात. दोन्हीपैकी काहीही घेतले तरी ते शरीराच्या पेशींना इजा पोहचवतेच. विस्कीमुळे व्यसन लागण्याची शक्यता बिअरपेक्षा जास्त असते, कारण त्यातील नशा तीव्र असते. आरोग्याचा विचार करता मद्यपान टाळणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world