निनाद करमरकर
महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याचं नाव नाही. रोज कुठे ना कुठे अत्याचाराची घटना होतच आहे. त्यामुळे महिला महाराष्ट्रात सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापूर, कल्याण, पुणे, अकोला अशा एका पाठोपाठ एक दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र त्यांना कुठेही चाप बसताना दिसत नाही. गुन्हेगारांना कसलाही धाक नसल्याचेही त्यातून दिसून येत आहे. त्यामुळेच अशा अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार परत एकदा त्याच बदलापूरमध्ये घडला आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न इथले नागरीक विचारत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत राहाणारी 19 वर्षाची तरुणी बदलापूरमध्ये रहात असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे आली होती. पार्टी करायची असं या दोघींचं ठरलं होतं. त्यानंतर बदलापूरच्या मैत्रिणीने तिच्या रिक्षा चालक मित्रालाही या पार्टीमध्ये बोलवलं. दत्ता जाधव असं त्याचं नाव होतं. या तिघांनी मिळून पार्टी केली. पार्टीमध्ये तिघेही बिअर प्यायले होते. मुंबईहून आलेल्या मैत्रिणीला बिअर जास्त झाली. ती आपली शुद्ध हरपून बसली होती. तीला काही ही समजत नव्हते. अशा वेळी रिक्षा चालक आणि दुसरी मैत्रिण यांची पार्टी सुरूच होती.
ट्रेंडिंग बातमी - Akola Crime news: शेळीचं पिल्लू आणायला म्हणून गेली अन् चिमुकली बरोबर भयंकर घडलं
19 वर्षाची तरुणी आपली शुद्ध पुर्ण हरपली आहे, हे त्या रिक्षा चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्यातला हैवान जागा झाला. त्याने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. विशेष म्हणजे या कृत्यात तिच्याच मैत्रिणीने त्या रिक्षा चालकाला साथ दिली. तो ही तिचाच मित्र होता. ज्यावेळी त्या तरुणीला शुद्ध आली, त्यावेळी तिला आपल्या बरोबर काही तरी चुकीचे झाले आहे हे लक्षात आले. ही घटना 21 डिसेंबरला घडली. त्यानंतर तिने झालेल्या प्रकारा विरोधात तक्रार करण्याचे ठरवले.
ट्रेंडिंग बातमी - Viral video: हॉर्न वाजवण्यावरून महानाट्य, रागाच्याभरात गाडीच्या टपावर चढला अन्...
23 डिसेंबरला ती थेट बदलापूर पूर्व पोलिस स्थानकात गेली. झालेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद केला. शिवाय आरोपीला शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 12 तासानंतर पोलिसांनी त्या नराधम रिक्षा चालक असलेल्या दत्ता जाधव या बेड्या ठोकल्या. तो बदलापूरच्या खरवई परिसरात लपून बसला होता. आपल्याला पोलिस शोधत आहेत याची भनक त्याला लागली होती.
ट्रेंडिंग बातमी - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल
पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world