जाहिरात

Shantanu Naidu's Girlfriend: शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिचे फोटो पाहून चाहत्या म्हणाल्या:Heart Broken

Who Is Shantanu Naidu's Girlfriend: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या जवळील व्यक्ती मानला जाणारा शंतनू नायडूने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केलीय.

Shantanu Naidu's Girlfriend: शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिचे फोटो पाहून चाहत्या म्हणाल्या:Heart Broken
Who Is Shantanu Naidu's Girlfriend: शंतनू नायडूच्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहिले का?

Who Is Shantanu Naidu's Girlfriend: दिवंगत उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारा शंतनू नायडू (Shantanu Naidu Social Media Post) पुन्हा एकदा चर्चेत आहे. शंतनू नायडूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या खास फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलंय. शंतनूने एका तरुणीसोबतचे सहा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण एकाही फोटोमध्ये त्या तरुणीचा चेहरा दिसत नाहीय. "Our souls didn't meet, they remembered" असे कॅप्शनही शंतनूने पोस्टला दिलंय. ही खास पोस्ट शेअर करुन शंतनूने तरुणीसोबतच्या नात्याची कबुली दिल्याचे दिसतंय. शंतनूच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. शंतनूने या 'Mystery Girl'सोबतचे फोटो शेअर केल्यानंतर कित्येक तरुणींचे मन दुखावले गेले आहेत, हे आम्ही कित्येक फॉलोअर्स स्वतः पोस्टवर कमेंट करुन सांगताहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shantanu Naidu Instagram

शंतनू नायडूची गर्लफ्रेंड कोण आहे?| Who Is Shantanu Naidu's Girlfriend?

शंतनूने खास फोटो शेअर केले असले तरी तिचा चेहरा दाखवणे टाळलं आहे. तसेच पोस्टमध्ये तिला टॅगही केले नाही. तिचे नावही जाहीर केलेले नाही. त्यामुळे शंतनूची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे, ती काय करते, कुठे राहते, या दोघांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली, तिचे नाव काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. 

(नक्की वाचा: Ratan Tata Motivational Quotes: योग्य दिशा दाखवणारे रतन टाटांचे प्रेरणादायी विचार)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shantanu Naidu Instagram

शंतनू नायडू कोण आहे? | Who Is Shantanu Naidu?

शंतनू नायडू हा एक उद्योजक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्यासोबतची त्याची अनोखी आणि खास मैत्री प्रेरणाचा विषय ठरली. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शंतनूने 'Motopaws' ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या निमित्तानेच रतन टाटा आणि शंतनूची भेट झाली. या भेटीचे रुपांतर जिव्हाळ्याचे नात्यामध्ये झाले.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shantanu Naidu Instagram

रतन टाटा यांनी शंतनूच्या Motopaws उपक्रमास निधी आणि पाठिंबाही दिला. कॉर्नेल विद्यापीठातून (Cornell University) एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2018मध्ये शंतनू टाटा ट्रस्टमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रुजू झाला. आताही तो टाटा ट्रस्टमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.

(नक्की वाचा: एक हसीना थी! बॉलिवूडमधील या अभिनेत्रीवर रतन टाटांचे होते प्रेम)

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shantanu Naidu Instagram

शंतनू मराठी भाषाही उत्तम बोलतो. सोशल मीडियावर त्याने कित्येक मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. काही पोस्ट तर गंमतीशीर आहेत.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Shantanu Naidu Instagram

Listen to the latest songs, only on JioSaavn.com