जाहिरात

Dialer Screen Change: अचानक मोबाईलची डायलर स्क्रीन का बदलली? Google ने सांगितलं कारण; नको असल्यास 'हे' करा

Why android Users Phone Call And Diler Setting Change:  हा बदल गुगलच्या मटेरियल ३ एक्सप्रेसिव्ह रीडिझाइनचा एक भाग आहे, जो अलीकडेच अँड्रॉइड १६ सह सादर करण्यात आला आहे.

Dialer Screen Change: अचानक मोबाईलची डायलर स्क्रीन का बदलली? Google ने सांगितलं कारण; नको असल्यास 'हे' करा

Mobile Dialer Screen Change Reason: अँड्रॉइड मोबाईल युजर्संच्या कॉलिंग ॲपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्ते चांगलेच हैराण झाले आहेत. अनेक अँड्रॉइड मोबाईल्सचा फोन डायलपॅड आणि डायलर इंटरफेसही अचानक बदलण्यात आला आहे. कोणत्याही नोटीफिकेशनशिवाय हा बदल करण्यात आल्याने मोबाईल युजर्सनी नाराजी दर्शवली आहे. मात्र  हा बदल गुगलच्या मटेरियल ३ एक्सप्रेसिव्ह रीडिझाइनचा एक भाग आहे, जो अलीकडेच अँड्रॉइड १६ सह सादर करण्यात आला आहे.

नेमका काय बदल झाला आहे?

गुगल फोन अॅपमधील कॉल लॉग आता पूर्वीसारखा ग्रुपिंग व्ह्यू दाखवत नाही आणि प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे सूचीबद्ध केला जात आहे. याशिवाय, कॉल हिस्ट्री आणि फेव्हरेट एकत्र करून होम टॅबमध्ये ठेवण्यात आले आहेत. कॉल आता गोलाकार कडा असलेल्या कार्डमध्ये दिसतात. तसेच, एक नवीन फिल्टर सिस्टम आली आहे, ज्यामुळे मिस्ड, स्पॅम, कॉन्टॅक्ट्स सारख्या श्रेणी सहजपणे वेगळ्या करता येतात. 

मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरचा अतिवापर मेंदूवर कसा परिणाम करतो? धोका टाळण्यासाठीचे उपाय काय?

मोबाईलच्या स्क्रीनवर नाव आणि फोन उचलण्याच्या, कट करण्याच्या प्रोसेसमध्येही मोठा बदल झाला आहे. भलेमोठे आयकॉन्स आणि बटन्स त्रासदायक असल्याचे काही युजर्सचे म्हणणे आहे. मात्र  गुगल म्हणते की ही नवीन डिझाइन संशोधनावर आधारित आहे. कंपनीने १८,००० हून अधिक वापरकर्त्यांचा अभ्यास केला होता, ज्यामध्ये असे आढळून आले की एक्सप्रेसिव्ह डिझाइनद्वारे लोक स्क्रीनवरील आवश्यक बटणे आणि माहिती पटकन ओळखतात. हा बदल फक्त फोन अॅपपुरता मर्यादित नाही, तर लवकरच गुगल मेसेजेस, कॉन्टॅक्ट्स, जीमेल आणि फोटोज सारख्या अॅप्समध्ये दिसून येईल.

नको असल्यास बंद कसे कराल?
दरम्यान, तुम्हाला जर हे नवे सेटिंग आवडले नसेल तर ते पुन्हा डिलीटही करता येईल. जाणून घ्या त्याची प्रोसेस:

  • फोन कॉलिंग ॲपवर जास्त लाँग प्रेस करा.
  • त्यानंतर APP INFO पर्यायावर क्लिक करा.. 
  • APP INFO मध्ये वरती दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • UNINSTALL UPDATE वर क्लिक करा... 

या पद्धतीने तुम्ही तुमचा डायलपॅड आणि डायलर इंटरफेस पहिल्यासारखा करु शकता. 

(नक्की वाचा-  Parenting Tips: शाळेतून आल्यावर मुलांना हे 5 प्रश्न नक्की विचारा? तज्ज्ञांनी कारणही सांगितलं)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com