जाहिरात

WhatsApp New Rule : ...तरच तुमच्या मोबाईलमध्ये सुरु राहणार WhatsApp, सरकारचा नवा नियम वाचलात का?

भारत सरकारने नव्या नियमानुसार प्रत्येक यूजरला त्यांचं व्हाट्सअॅप (WhatsApp) अकाऊंट त्या सिमकार्डने जोडावं लागणार आहे, जे त्यांच्या मेन फोनमध्ये लावण्यात आलं आहे.

WhatsApp New Rule : ...तरच तुमच्या मोबाईलमध्ये सुरु राहणार WhatsApp, सरकारचा नवा नियम वाचलात का?
What's App New Rule In India

WhatsApp New Rule : भारत सरकारने नव्या नियमानुसार प्रत्येक यूजरला त्यांचं व्हाट्सअॅप (WhatsApp) अकाऊंट त्या सिमकार्डने जोडावं लागणार आहे, जे त्यांच्या मेन फोनमध्ये लावण्यात आलं आहे. हा नियम डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सकडून (Department of Telecommunications) लागू करण्यात आला आहे. इतकच नाही, तर हा नियम टेलिकॉम सायबर सेक्युरिटी नियमानुसार (Telecom Cyber Security Rules) अनिवार्य आहे. म्हणजे व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांना हा नियम पाठावाच लागणार आहे. 
सिम बायडिंग

आतापर्यंत व्हाट्सअॅप 'व्हेरिफाय वन्स' मॉडलवर चालायचं. म्हणजेच तुम्ही मोबाईल नंबर टाकायचे आणि ओटीपीने एकदा व्हेरिफिकेशन करायचे. त्यानंतर सिम काढल्यावरही अॅप सुरु राहायचं. त्यानंतर तुम्ही व्हाट्सअॅप वेब, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरी सहज लॉग इन करू शकत होते. फोनमध्ये जरी सिम नसेल,तरीही हे अॅप सुरु राहायचं. पण आता नव्या नियमानंतर ही सुविधा पूर्णपणे बदलली आहे. 

आता तुमचा व्हाट्सअॅप अकाऊंट नेहमी त्याच सिम कार्डशी कनेक्टेड असलं पाहिजे, जो सिम फोनमध्ये लावलेलं असेल. रिपोर्ट्सनुसार, अॅप जवळपास सहा तासांमध्ये हे तपासेल की, रजिस्टर्ड सिम फोनमध्ये उपलब्ध आहे की नाही..जर तुम्ही सिम काढून टाकलं, बदललं किंवा सिम बंद झालं, तर तुमचं व्हाट्सअॅप लगेच बंद होईल.पुन्हा सुरु करण्यासाठी तेच सिम पुन्हा फोनमध्ये लावून व्हेरिफाय करावं लागेल.

नक्की वाचा >>IND vs WI, T20 World Cup 2026: सेमी फायनलआधी गांगुलीनं घेतली गंभीरची शाळा, म्हणाला, "इंग्लंडला हरवायचंय मग.."

सरकारने हे पाऊल का उचललं?

सरकारच्या माहितीनुसार, देशात सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे वेगाने वाढत आहे.अनेक प्रकरणांमध्ये उघडकीस आलं आहे की, फ्रॉड लोक भारतीय मोबाईल नंबरने व्हाट्सअॅप व्हेरिफाय करतात आणि परदेशातून ते अकाऊंट चालवतात.यामुळे त्यांना ट्रॅक करणं कठीण बनतं. सिम बायडिंग लागू करण्याचा उद्देश हा आहे की,प्रत्येक अॅक्टिव्ह व्हाट्सअॅप अकाऊंट KYC व्हेरिफाईड सिमसोबत कनेक्टेड राहावं आणि तो सिम वास्तविक एखाद्या डिव्हाईसमध्ये उपलब्ध असावा.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, यामुळे बोगस अकाऊंट बंद होतील आणि लोकांची पैशांची फसवणूक थांबेल. सरकारी आकडेवारीनुसार, 2024 मध्ये सायबर फ्रॉडमुळे 22800 कोटींहून जास्त रुपयांचं नुकसान झालं आहे. व्हाट्सअॅप कंपनीने भारतात काही यूजर्सला आधीच नोटिफिकेशस्न पाठवणं सुरु केलं आहे. ज्यामध्ये लिहिलंय की, भारतात नियमानुंसार सिमची तपासणी केली जाईल. एन्ड्रॉईडच्या बिटा व्हर्जनमध्ये सतत सिम व्हेरिफिकेशन सिस्टमची टेस्टिंगही सुरु आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com