जाहिरात

Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीचा अर्थ आणि महत्त्व काय, जाणून घ्या सविस्तर

Gudi Padwa 2025: हिंदू पंचांगनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाचा शुभारंभ होतो. हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा अर्थ काय, हा सण का साजरा केला जातो? जाणून घेऊया माहिती...

Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? गुढीचा अर्थ आणि महत्त्व काय, जाणून घ्या सविस्तर
Gudi Padwa 2025: गुढी या शब्दाचा अर्थ काय?

Gudi Padwa 2025 Marathi Recipes: गुढीपाडवा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वपूर्ण उत्सव आहे. गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतनवर्ष. या दिवशी घरासमोर गुढी उभारुन तिची पूजा करुन नैवेद्य अर्पण केला जातो. याच दिवसापासून वसंत ऋतूचीही सुरुवात होते. मराठी नवीन वर्षाचे स्वागत महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही मोठ्या थाटामाटात केले जाते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुढीपाडवा सण का साजरा केला जातो? 

हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतासह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली होती, या कारणामुळे हा दिवस संवत्सराचा पहिला दिवस ठरला. अशा अनेक कारणांमुळे गुढीपाडवा सण साजरा करण्याची परंपरा आजही जपली जातेय. 

गुढी कशी उभारावी?

बांबूच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेच्या धातूचे कलश पालथे घालावे. त्यावर कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ आणि साखरेची माळ बांधावी. सजवलेली गुढी दारासमोर उभारावी आणि गुढीची पूजा करावी. कलश आणि पताकायुक्त गुढी हे आनंदोत्सवाचे प्रतीक मानले जाते.  

(नक्की वाचा: Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि सणाचे महत्त्व)

कधी आहे गुढीपाडवा? गुढी या शब्दाचा अर्थ काय? (Gudi Padwa 2025 Date Or Shubh Muhurat) 

गुढी म्हणजे ध्वज. यंदा गुढीपाडवा सण 30 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथीचा 29 मार्च रोजी संध्याकाळी 4.27 वाजता शुभारंभ होणार असून 30 मार्चला दुपारी 12.49 वाजता तिथी समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये उदया तिथीला महत्त्व आहे, त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजीच साजरा केला जाईल. 

गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते.  घरासमोर सुंदर रांगोळी काढून दिवा लावला जातो. गुढीची मनोभावे पूजा केली आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो. 

(नक्की वाचा: Happy Gudi Padwa 2025 Wishes: सुखाची गुढी, आनंदाचा कळस! प्रियजनांना पाठवा गुढीपाडवा सणाच्या खास शुभेच्छा)

गुढीपाडवा सणाला कोणते गोड पदार्थ तयार करावे?

पुरणपोळी  

गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील मुख्य पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक आहे. विशेषतः सणांच्या दिवशी घराघरात पुरणपोळी हमखास तयार केली जाते. गूळ आणि चण्याच्या डाळीपासून पुरण तर मैदा-रव्याच्या मिश्रणाने पोळीचे पीठ तयार केले जाते. साजूक तुपासह पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो.  (Video Credit Insta @ _indian_tastebuds_)

श्रीखंड 

गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंडचाही नैवेद्य अर्पण केला जातो. दह्याचे पाणी गाळून चक्का तयार केला जातो. त्यानंतर चक्क्यामध्ये साखर, वेलची पूड, केशर मिक्स केले जाते. मिश्रण योग्य पद्धतीने फेटून घेतले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख सणांकरिता श्रीखंड तयार केले जाते किंवा बाजारातून विकत आणले जाते.  (Video Credit Insta @ Omkar Pawar)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)