AC Room Tips and Tricks : उन्हाळ्याची सुरुवात होताच घामाच्या धारांनी जीव हैराण होतो. या धगधगत्या उकाड्यात एयर कंडिशनरमुळे दिलासा मिळतो. एसीची थंड हवा उकाड्यात वरदानापेक्षा कमी नाही. उन्हामधून आल्यानंतर एसीच्या खोलीत शिरताच बरं वाटतं. तुम्ही पाहिलं असेल की, बरेच जण एसी लावलेल्या खोलीत पाण्याने भरलेली बादली ठेवतात. तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटेल, मात्र यामागे मोठं कारण आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
एसी लावलेल्या खोलीत लोक पाण्याने भरलेली बादली का ठेवतात?
खोली थंड करण्यासाठी एयर कंडिशनर खोलीतील ओलावा शोषून घेतं. यामुळे खोली ड्राय होते आणि हवादेखील कोरडी होते. यामुळे केवळ त्वचेलाच नुकसान पोहोचत नाही तर आरोग्यासाठीही धोकादायक आहे. या समस्येतून सुटका मिळविण्यासाठी लोक कोणताही महागडा किंवा मोठा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरत नाहीत. केवळ खोलीत पाण्याने भरलेली बादली ठेवतात. ही बाब तुम्हाला विचित्र वाटू शकते, मात्र ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.
पाण्याची बादली म्हणजे नैसर्गिक ह्युमिडिफायर...
खोलीत बराच काळ एसी सुरू ठेवल्याने हवा थंड तर होते, मात्र हवा अधिक कोरडी होते. यामुळे त्वचा कोरडी पडते. अशात खोलीत पाण्याची बादली ठेवल्याने पाणी हळूहळू हवेत मिसळतं. ही पाण्याची बादली नैसर्गिक ह्युमिडिफायर प्रमाणे काम करते. ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि घसा कोरडाही होत नाही. यासह त्वचा हेल्दी राहते. याशिवाय झोपही चांगली येते.
AC च्या खोलीत पाण्याची बादली ठेवण्याची पद्धत काय आहे?
- पाण्याने भरलेली बादली खोलीतील अशा ठिकाणी ठेवा, जेथे एसीच्या हवेचा संचार चांगला असेल.
- पाण्याने भरलेली बादली खोलीतील सुरक्षित कोपऱ्यात ठेवावी, ज्यामुळे कुणाला धक्का लागणार नाही.
- एसीच्या खोलीत पाण्याची बादली ठेवताना, ती झाकून ठेऊ नका. पाणी जितकं जास्त हवेच्या संपर्कात असेल तितकी चांगली ह्युमिडिटी राहील.
- पाण्याची बादली स्वच्छ असायला हवी, याशिवाय दररोज हे पाणी बदला आणि बादली स्वच्छ करा.
- पाण्याची बादली इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर ठेवा, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका राहणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world