जाहिरात

Chakvat Benefits: चाकवत खाल्ल्यास कोणते आजार बरे होतील, पोट पटकन स्वच्छ होईल का; रोज खाऊ शकतो?

Chakvat Benefits: चाकवतची भाजी खाल्ल्यास कोणते आजार ठीक होतील? चाकवतची भाजी प्रकृतीस थंड आहे की उष्ण? आरोग्यास कोणते फायदे मिळतील, ही भाजी कोणी खाऊ नये, यासह असंख्य प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...

Chakvat Benefits: चाकवत खाल्ल्यास कोणते आजार बरे होतील, पोट पटकन स्वच्छ होईल का; रोज खाऊ शकतो?
"Chakvat Benefits: चाकवत भाजी खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळतील"
Canva

Chakvat Benefits| Bathua Benefits In Marathi: हिवाळा ऋतू सुरू होताच बाजारापेठांमध्ये हिरव्यागार भाज्यांची आवक वाढते, यापैकीच एक पौष्टिक भाजी म्हणजे चाकवत. ही पालेभाजी चवदार आणि आरोग्यवर्धक असते. हिवाळ्यामध्ये बहुतांश घरांमध्ये चाकवत भाजीचा आस्वाद घेतला जातोच. आयुर्वेदामध्ये या भाजीस (Chakvat Bhaji Benefits) शरीराची स्वच्छता करणारे नॅचरल डिटॉक्स असंही म्हणतात. चाकवत भाजी खाण्याच्या फायद्यांसह अन्य माहिती जाणून घेऊया...

चाकवत भाजी कोणी खावी आणि कोणी खाऊ नये? | Chakvat Benefits And Who Should Not Eat It| Bathua Benefits And Who Should Not Eat It

चाकवत भाजी खाल्ल्यास कोणते आजार ठीक होतील? 

चाकवत भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शिअम यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. यामुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासूनही सुटका मिळते. गॅस, पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी ही भाजी औषधापेक्षा कमी नाहीय.

इतकंच नाही तर चाकवत भाजीतील पोषणतत्त्वांमुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. पिंपल, त्वचेवर येणारी खाज, रॅशेज यासारख्या त्वचाविकारांवर ही भाजी रामबाण उपाय आहे. चाकवत भाजीचा रस प्यायल्यास यकृत मजबूत होईल आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील. 

कोणते आजार ठीक होतील?

सांधेदुखी, संधिवात किंवा रक्तदाब यासारख्या आजारांचा सामना करत असाल तर चाकवत भाजी खाणे फायदेशीर ठरेल. हिवाळ्यामध्ये या भाजीचा डाएटमध्ये समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि शरीराला उष्णता मिळेल.  

चाकवतची भाजी कशी खावी? (Taste of Bathua| Chakvat Roti And Some Precautions)

चाकवत भाजीची पोळी किंवा पराठा हिवाळ्यामध्ये खाल्ल्यास आरोग्यास प्रचंड फायदे मिळतील. थोडेसे तूप लावून पराठा खाल्ल्यास शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळेल. 

चाकवत भाजी कोणी खाऊ नये? (Who Should Not Eat Bathua| Chakvat?)

चाकवत भाजीची प्रकृती उष्ण आहे, त्यामुळे मूतखड्याची समस्या असणाऱ्यांनी मर्यादित स्वरुपात या भाजीचे सेवन करावे. कारण या भाजीमध्ये ऑक्सलेटचे तत्त्व आहे, ज्यामुळे मूतखड्याची समस्या वाढू शकते. गर्भवती महिलांनीही ही भाजी जास्त प्रमाणात खाऊ नये तसेच त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Shilpa Shetty Yoga Pose Video: शिल्पा शेट्टीचे हे आवडतं आसन सर्व ताण पटकन करेल दूर, पाहा VIDEO

(नक्की वाचा: Shilpa Shetty Yoga Pose Video: शिल्पा शेट्टीचे हे आवडतं आसन सर्व ताण पटकन करेल दूर, पाहा VIDEO)

चाकवत भाजीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल का?

चाकवत भाजीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे मल त्याग सहजरित्या होण्यास मदत मिळते. पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारख्या पचनप्रक्रियेशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते. नियमित चाकवत खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल. 

Bad Cholesterol Symptoms: बॅड कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

(नक्की वाचा: Bad Cholesterol Symptoms: बॅड कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com