जाहिरात

Bad Cholesterol Symptoms: बॅड कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Bad Cholesterol Symptoms: शरीरातील खराब कोलेस्टेरॉल हा एक सायलेंट किलर आजार आहे, यामुळे कित्येक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Bad Cholesterol Symptoms: बॅड कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
"Bad Cholesterol Symptoms: खराब कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात?"
Canva AI

Bad Cholesterol Symptoms: धकाधकीच्या जीवनामध्ये खराब कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या आता सामान्य झालीय. बहुतांश लोक या समस्येमुळे त्रासलेले असतात. शरीरामध्ये खराब कोलेस्टेरॉलची पातळी हळूहळू वाढते त्यावेळेस विशेष प्रकारची लक्षणं दिसत नाहीत, म्हणूनच ही समस्या एक सायलेंट किलर आजार म्हणून ओळखली जाते. 

सुरुवातीच्या टप्प्यात खराब कोलेस्टेरॉलची लक्षणं का दिसत नाहीत?

शरीरामध्ये खराब कोलेस्टेरॉलची पातळी हळूहळू वाढत जाते आणि रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूने चरबीच्या स्वरुपात जमा होऊ लागते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात, परिणामी हृदयापर्यंत रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. पण सर्व प्रक्रिया इतकी धीम्या गतीने होते की रुग्णाला काहीच कळतच नाही. 

खराब कोलेस्टेरॉलची लक्षणे 

छातीमध्ये वेदना होणे

जेव्हा हृदयाच्या स्नायूपेशींपर्यंत रक्त पोहोचत नाही, तेव्हा छाती जड होणे किंवा छातीमध्ये वेदना जाणवू लागतात.   

थकवा जाणवणे

जास्त प्रमाणात कष्ट न केल्यासही थकवा जाणवणे, कारण शरीराच्या आतील अवयवयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. 

हात-पाय सुन्न होणे किंवा दुखणे

गंभीर प्रकरणांमध्ये पायांच्या नसावंरही परिणाम होतात, ज्यामुळे चालताना पाय दुखू लागतात किंवा पायांमध्ये सुन्नपणा जाणवतो. 

डोळ्यांच्या आसपास पिवळे डाग येणे

काही लोकांच्या पापण्यांच्या आसपासच्या त्वचेवर चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे लक्षणांची वाट पाहू नका वेळोवेळी आवश्यक वैद्यकीय तपासणी करुन आरोग्याची काळजी घ्यावी.  

Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप

(नक्की वाचा: Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप)

काय उपाय करावे?

वयाची तिशी गाठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वर्षातून एकदा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लिपिड प्रोफाइल टेस्ट करणं आवश्यक आहे. पौष्टिक आहाराचे सेवन करावे आणि तेलकट-तिखट खाद्यपदार्थ डाएटमधून वर्ज्य करा. नियमित व्यायाम करावा. 

Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?

(नक्की वाचा: Sleeping On Stomach: पोटावर झोपणं आरोग्यासाठी योग्य ठरेल का? पोटाची चरबी पटकन कमी होईल का?)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com