
मागील काही वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. शेअर बाजारात जास्त परताव्याच्या आशेने अनेक जण गुंतवणूक करतात. मात्र भारतीय महिला शेअर बाजाराव्यतिरिक्त इतरत्र गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवत आहेत. ॲनारॉकच्या अहवालातून महिलांच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिला आता शेअर बाजाराऐवजी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. 2022 च्या आकडेवारीवर नजर टाकली तर 20 टक्के महिला शेअर बाजारात गुंतवणुकीला प्राधान्य देत होत्या. ही आकडेवारी घसरून 2024 मध्ये केवळ 2 टक्क्यांवर आली आहे.
(नक्की वाचा- महिला दिनानिमित्त 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट; अकाऊंटमध्ये येणार एवढे पैसे)
प्रीमियम आणि लग्झरी घरे खरेदीवर भर
महिला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतानाही विशेष काळजी घेत आहे. महिला प्रीमियम आणि लग्झरी घरे खरेदीवर भर देत आहेत. 2024 च्या दुसऱ्या सहामाहीचा आकडा पाहिला तर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. 2024 च्या दुसऱ्या सहामाहीत प्रॉपर्टीत गुंतवणूक करणाऱ्या महिलांपैकी 52 टक्के महिलांना 90 लाखांहून अधिक महाग घरे खरेदी केले आहेत. 2022 मध्ये हा आकडा 47 टक्के होता.
या 52 टक्के महिलांपैकी 33 टक्के महिलांनी 90 लाख ते 1.50 कोटी रुपये किमतीची घरे खरेदी केले आहेत. 11 टक्के महिलांनी 1.50 कोटी ते 2.50 कोटी रुपयांची घरे खरेदी केली. तर 8 टक्के महिलांनी अडीच कोटींहून अधिक किमतीची प्रॉपर्टी खरेदी केली.
(नक्की वाचा- 31 वर्षांनंतर बाजारात भयंकर परिस्थिती! काय आहेत कारणं आणि उपाय? वाचा तज्ज्ञांचा सल्ला)
रिअल इस्टेट पहिली पसंत
सर्वेमध्ये सामील झालेल्या 70 टक्क्यांहून अधिक महिलांनी रिअल इस्टेट आपली पहिली पसंत असल्याचं सांगितलं. 2022 मध्ये हा आकडा 65 टक्के तर 2019 मध्ये हा आकडा 65 टक्के होता. रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीतून मिळणारा स्थिर परतावा हे या मागचं प्रमुख कारण आहे. ॲनारॉकच्या सर्वेतून स्पष्ट होत आहे की, महिला तयार घरांऐवजी अंडर कन्स्ट्रक्शन घर खरेदीला पसंदी देत असल्याचंही यातून समोर आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world