World Meditation Day 2025: मेडिटेशनचे 5R काय आहेत? ध्यान कसं सुरू करावं? वाचा सविस्तर माहिती

World Meditation Day 2025: तुम्ही देखील ध्यानधारणा करण्याचा विचार करत आहात का? कशी करावी सुरुवात? मेडिटेशनचे 5R जाणून घ्या

जाहिरात
Read Time: 2 mins
World Meditation Day 2025: जागतिक ध्यान दिवस 2025
Canva

World Meditation Day 2025: धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण कमी करण्यासाठी लोक कित्येक उपाय करतात. पण याऐवजी नियमित ध्यानधारण केल्यास मानसिक आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. जागतिक ध्यान दिनानिमित्ताने 2025 (World Meditation Day 2025) ध्यान करण्याची योग्य पद्धत आणि मेडिटेशन करण्याचे 5R जाणून घेऊया... 

मेडिटेशनचे 5R काय आहेत?

मेडिटेशनचे पाच आर म्हणजे ओळखळे (Recognize), सोडणे (Release), आराम करणे (Relax), प्रतिक्रिया देणे (Respond) आणि पुन्हा येणे (Return). याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

1. Recognize (ओळखणे): मेडिटेशन करताना तुम्हाला तुमचे विचार आणि भावना व्यवस्थित ओळखणे आवश्यक आहे. 
2. Release (सोडणे): तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा ताण आणि चिंता असेल एक दीर्घ श्वास घ्या, पुन्हा सोडा. यामुळे मानसिक शांतता लाभेल. 
3. Relax (आराम): मेडिटेशन करताना तुम्ही एखाद्या विचारांमध्ये अडकले असाल तर दीर्घ श्वास घ्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. 
4. Respond (प्रतिक्रिया): आता मनाकडून सकारात्मक प्रतिसाद येऊ द्यावा. स्वतःशी शांततेने संवाद साधा, मी शांत आहे आणि मी ठीक आहे, असे म्हणा. 
5. Return (पुन्हा येणे): ध्यान करताना तुमचे मन भरकटत असेल तर स्वतःवरच राग काढण्याऐवजी पुन्हा ध्यान करण्यावर लक्ष केंद्रित करा.  

पूर्वी कधीही ध्यान केले नसेल तर ध्यान करण्यास सुरुवात कशी करावी?

1. दोन-तीन मिनिटांनी सुरुवात करावी 

बहुतांश लोक ध्यान करणं टाळतात कारण यासाठी 20-30 मिनिटांचा कालावधी लागतो आणि पूर्ण शांतता हवी असते. तुम्ही यापूर्वी ध्यान केले नसेल तर सुरुवातीस दोन ते तीन मिनिटे पुरेशी ठरतील. 

Advertisement

2. नियमित ध्यानधारण करावी

एखाद्या गोष्टीची सवय होण्यासाठी ती गोष्ट नियमित करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही रोज सकाळी चहा पित असाल किंवा झोपण्यापूर्वी दात घासत असाल तर कामानंतर लगेचच काही मिनिटे ध्यान करण्याचीही सवय लावून घ्यावी. 

Advertisement

(नक्की वाचा: Why Do You Yawn: दुसऱ्याला पाहून आपल्यालाही जांभई का येते? या 4 गोष्टी 99% लोकांना माहितीही नसतील)

3. परिणामांचा विचार करू नका

सुरुवातीस ध्यान करणं तुम्हाला कठीण वाटू शकते. पण हळूहळू सर्व समस्या दूर होऊन तुमचे ध्यान करताना लक्ष केंद्रित होईल. काही वेळानंतर तणाव दूर होऊन पूर्णपणे शांतता मिळेल. अशातच तुम्ही परिणामांचा विचार न करता हळूहळू स्वतःमध्ये घडणारे बदल अनुभवावे. 

Advertisement

(नक्की वाचा: How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स)

4. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात

मेडिटेशन करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती एकसारख्या नसतात. ज्या पद्धती एखाद्या व्यक्तीचं मन शांत करत असतील तर त्याच पद्धती दुसऱ्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतात. काही लोकांना पूर्ण शांततेत ध्यान करणं आवडतं तर काहींना मार्गदर्शनानुसार ध्यान करणं पसंत असतं. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)