
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुढीपाडव्यानिमित्ताने नागपूर दौऱ्यावर होते. नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधला.
- आयुष्मान भारत योजनेच्या फायद्यांची माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासाठी बलिदान दिलेल्या वृद्धांना उपचाराची काळजी करण्याची गरज नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे आज कोट्यवधी जनतेला मोफत उपचार सुविधा मिळत आहेत. हजारो जन औषधी केंद्रामुळे देशात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाला स्वस्त औषधं मिळत आहेत. देशात हजारो डायलेसिस सेंटर मोफत सेवा देत आहेत. यामुळे देशभरातील जनतेचे हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे.
- देशात सरकारकडून गरीबांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी काय पाऊले उचलली जात आहेत, याबाबत आपली भूमिका मांडलील. माधव नेत्रालय एक असं संस्थान आहे, जे अनेक वर्षांपासून लोकांची सेवा करत आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात प्रकाश येतो. यानिमित्ताने नव्या सेंटरची पायाभरणी होत आहे. यामुळे आणखी लोकांच्या आयुष्यातील अंध:कार दूर होईल. त्यानिमित्ताने माधव नेत्रालयाशी जोडलेल्यांना शुभेच्छा. आज स्वास्थ क्षेत्रात देश ज्या पद्धतीने काम करतोय. माधव नेत्रालय त्या प्रयत्नांना वाढवत आहे.
- देशातील प्रत्येक व्यक्तीला प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची प्राथमिकता आहे. आयुष्मान भारतामुळे कोट्यवधींना मोफत सुविधा मिळत आहेत. हजारो जन सुविधा केंद्र मध्यमवर्गीय आणि गरजूंना स्वस्त औषधं देत आहेत. गेल्या दहा वर्षात गावांमध्ये लाखो आरोग्य आयुष्मान मंदिरं तयार झाली आहेत. येत्या काळात लोकांच्या सेवेसाठी अधिकाधिक दर्जेदार डॉक्टर उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
- गरिबांचा मुलगा डॉक्टर बनावा म्हणून डॉक्टर बनण्याची सुविधा आम्ही उपलब्ध केली. आपलं शरीर परोपकार आणि सेवा करण्यासाठी आहे. सेवा संस्कारात येते तेव्हा सेवा साधना बनते. साधना-सेवा-संस्कार प्रत्येक स्वयंसेवकांना निरंतर गतिमान ठेवते. स्वयंसेवक आपलं कर्तव्य करीत राहतो. छोटा मोठा कोणतंही काम असेल वा कार्यक्षेत्र असेल... डोंगराळ भाग असेल तरी संघाचे स्वयंसेवक निस्वार्थपणे काम करत राहतो.
- सद्यपरिस्थितीत कोणी आदिवासी पाड्यात शिक्षण देत आहे. कोणी गरीब वंचितांच्या सेवेत आहे. कुंभमेळाव्यात त्यांनी लाखो लोकांची सेवा केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक. कुठेही संकट आलं तरी स्वयंसेवक अनुशासित शिपाई म्हणून सेवा भावनेने काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे. हा अक्षयवट आज भारतीय संस्कृतीला निरंतर ऊर्जा देत आहे.
- गुलामगिरीच्या मानसिकतेला मागे टाकत भारत पुढे वाटचाल करीत आहे. 70 वर्षांपूर्वीच्या देशाला मागे टाकलं आहे. भारतीयांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आता भारतीय न्यायसहिंता लागू केली. नौसेनेच्या जागी गुलामी चिन्ह होतं, त्याठिकाणी आता शिवाजी महाराजाचं प्रतीक आहे.
- योग आणि आयुर्वेदाला आज जगभरात नवी ओळख मिळाली आहे. भारताला सन्माम मिळत आहे. कोणत्याही राष्ट्राचं अस्तित्व तिथल्या संस्कृतीच्या विस्तारावर आणि त्या राष्ट्राच्या जाणीवेवर अवलंबून असतं. भारताची चेतना अजून संपलेली नाही. त्याची ज्योत सतत धगधगत असते.
- गेल्या काही वर्षात गावांमध्ये लाखो आरोग्य मंदिराची उभारणी केली. येथे नागरिकांना प्राथमिक उपचार मिळतो. गावकऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शेकडो किलोमीटर दूर जावं लागत नाही.
- आम्ही केवळ मेडिकल कॉलेजची उभारणी केली नाही तर एम्सती सुविधा तीन पटीने वाढवली आहे. देशातील मेडिकल सीट दुप्पटीने वाढली आहे.
- देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वैद्यकीय क्षेत्रात इतकी उन्नती पाहायला मिळाली. देशातील गरीब कुटुंबातील मुलाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं. मातृभाषेतही विद्यार्थी डॉक्टर होण्याचं शिक्षण घेऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world