
माहिती अधिकारी माहिती न दिल्याने उल्हासनगरच्या बांधकाम विभागातीन दोन अभियंत्यांना दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार आयुक्त यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर विभागात खळबळ उडाली आहे.
एक जनयाचिकाअंतर्गत माहिती न दिल्याने उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग उपअभियंता अश्विनी आहुजा, विजय पाटील यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात समाधानकारक खुलासा न दिल्यामुळे घेतलेल्या सुनावणीला दोघेही गैरहजर होते. याबाबत त्यांनी कोणताही खुलासा दिला नव्हता. त्यामुळे या दोघांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नक्की वाचा - BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा
यातील उपअभियंता आहुजा सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून दहा हप्त्यात हा दंड वसूल केला जाणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world