Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेच्या तीन वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी रद्द करण्यात आली असून यात प्रकाशचंद जैन होमिओपॅथी, आयुर्वेदिक व फिजिओथेरपी महाविद्यालयाचा समावेश आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे महाविद्यालयाचे परवानगी रद्द करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले असून तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे.
प्रकाशचंद जैन संस्थेने वैद्यकीय महाविद्यालयासाठी पळसखेडा ग्रामपंचायतसह जामनेर नगरपरिषद आणि नगर रचना विभागाकडे बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. तसेच संस्थेच्या इमारती ही नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीच्या चौकशीवरून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Mumbai News : इंदूरनंतर मुंबईतील 9 किन्नरांचा आत्महत्येचा प्रयत्न, टोकाचं पाऊल का उचलत आहेत?
वैद्यकीय महाविद्यालयासाठी संस्थेने पळसखेडा ग्रामपंचायत जामनेर नगर परिषद व नगर रचना विभागाकडे बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत तक्रार करण्यात आली होकी. नियमांचे उल्लंघन करून संस्थेच्या इमारती बांधण्यात आल्याचीही तक्रारी करण्यात आल्याचा आरोप होता. तीनही वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी रद्द झाल्याने महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
