
सुनील कांबळे, लातूर
Latur News : लातुरात दोन वाहन चालकांमध्ये झालेल्या वादानंतर कार चालकाने मोटारसायकल चालकाला मारहाण केली. पाकिस्तानी आहेस का म्हणत हिणवले आणि मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली. दरम्यान डिप्रेशनमध्ये गेलेल्या अमीर पठाण या 30 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून कार चालकाच्या विरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमीर पठाण आपल्या पत्नीला दररोज शहराच्या संविधान चौकामध्ये नोकरीला जाण्यासाठी सोडत होता. त्याची पत्नी समरीन पठाण ही उस्मानाबाद येथे ॲक्सिस बँकेमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. तर अमीर पठाण हा लातूरात एअरटेल कंपनीमध्ये रिलेशनशिप मॅनेजर या पदावर काम करत होता.
(नक्की वाचा- Pune News : मुलासमोरच बायकोला संपवलं, विल्हेवाट लावताना फसला अन् पोलिसांना सापडला)
अमीर पठाण आपल्या पत्नीला सकाळी आणि सायंकाळी सविधान चौकामध्ये ने-आण करत असे. दरम्यान एका कार चालकासोबत त्याचा किरकोळ वाद सुरू झाला. त्यातूनच कार चालकाने अमीर पठाण याला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करतानाचा त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली.
"तू पाकिस्तानी आहेस, का कश्मीरी आहेस", अशी विचारणा करत हा व्हिडिओ काढत त्याला मारहाण करण्यात आली. भर चौकामध्ये अमीर पठाण याला झालेली ही मारहाण त्याच्या जिव्हारी लागली. यातूनच त्यानं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- Railway News : मुंबईत मेट्रोनंतर जमिनीखालून धावणार रेल्वे? परेल-CSMT मार्गावर विचार सुरु)
डिप्रेशनमध्ये गेलेल्या अमीर पठाण यांने घरामध्येच गळफास घेत आपलं जीवन संपवले. दरम्यान जोपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत नातेवाईकांनी लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मारहाण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्याच्या पत्नीने केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world