मतदार नोंदणीसाठी एकाच व्यक्तीचे 462 बोगस अर्ज, एक चुक अन् अलगद अडकला

गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 30 अर्ज केल्याची घटना ताजी असतानाच, आता कराड उत्तरमधील मतदार नोंदणीत देखील तसाच प्रकार समोर आलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

सुजित आंबेकर 

साताऱ्यातील एकाच व्यक्तीने मतदार नोंदणीसाठी तब्बल 462 बोगस ऑनलाईन अर्ज केल्याचे समोर आले आहे. गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 30 अर्ज केल्याची घटना ताजी असतानाच, आता कराड उत्तरमधील मतदार नोंदणीत देखील तसाच प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहेत. त्यांनी केलेली आयडीया त्याच्या अंगाशी आल्याचेही बोलले जात आहे. एक चुक त्याला महागात पडली आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वीज देयकात खाडाखोड करून एकाच व्यक्तीने मतदार नोंदणीसाठी तब्बल 462 ऑनलाईन अर्ज केले होते. याप्रकरणी निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित अविनाश विजय धर्मे याला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने आणखी काही अर्ज मतदार नोंदणीसाठी केलेत का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. राज्यात आता विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. 

ट्रेंडिंग बातमी - पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार, जिंकला नाही पण काँग्रेसचा उमदेवार पाडला

निवडणूक आयोगाच्या पोर्टल आणि संकेतस्थळावर निरंतर मतदार नोंदणी अंतर्गत, नाव नोंदणी, दुरुस्ती,वगळणी व स्थलांतरित अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधेचा गैरवापर या आरोपीने केला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात नमुना आठ या अर्जाद्वारे अविनाश धर्मे या व्यक्तीने स्थलांतर दाखवून पोर्टलमध्ये एक दोन नाही तर तब्बल 462 अर्ज दाखल केले आहेत. शिवाय अर्जासोबत रहिवासाबाबतचा पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी राहाणार हजारमाची, कराड यांचे वीज देयक दिले आहे. शिवाय त्यावरील ग्राहक क्रमांकाच्या अखेरच्या चार अंकामध्ये व्हाइटनरचा वापर करून खाडाखोड केली आहे. तिथेच त्याचा डाव फसला.  

ट्रेंडिंग न्यूज - हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं

पुराव्याचे कागदपत्र म्हणून खाडाखोड केलेले हे वीज बील ऑनलाईन त्याने अपलोड केले आहे. त्यानंतर निवडणूक शाखेने कागदपत्रांची पडताळणी केली. त्यात काही तरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या प्रकरणी तातडीने  निवडणूक शाखेने गुन्हा नोंद केला. त्यानंतर सुत्र हलली. कराड शहर पोलिसांनी संशयित अविनाश धर्मे यास ताब्यात घेतले आहे. सध्या कराड शहर पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?

कराड दक्षिण विधानसभा निवडणूक ही राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरणार आहे. या मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सध्या त्यावर तक्रारी दाखल होत असून तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक शाखा सखोल चौकशी करत आहे. लवकरच कराड दक्षिणमध्येही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.