हरियाणा विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपच्या विजया पेक्षा जास्त चर्चा झाली ती काँग्रेसच्या पराभवाची. भाजपची रणनिती आणि काँग्रेसचा ओव्हर कॉन्फीडन्स यावरही चर्चा झाली. मात्र हरियाणातील एक विधानसभेची अशीही जागा आहे, तीथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसचाच उमेदवार पाडण्याला हातभार असल्याचे समोर आले आहे. हा मतदार संघ आहे असांध. या मतदार संघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा विरेंद्र वर्मा यांना उमेदवारी दिली होती. ते या मतदार संघातून विजयी होऊ शकले नाहीत. पण त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार मात्र अल्प मतांनी पराभूत झाला हे आता समोर आले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
असांध मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मराठा विरेंद्र वर्मा यांना उमेदवारी दिली होती. शरद पवारांनी हरियाणामध्ये लोकतंत्र सुरक्षा पार्टी बरोबर युती केली होती. त्या युतीचे विरेंद्र वर्मा हे उमेदवार होते. शिवाय मराठा विरेंद्र वर्मा हे हरियाणाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ही आहेत. या मतदार संघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. इथे काँग्रेसने समशेर सिंह गोगी यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा विजय निश्चित होता असेही बोलले जात होता. भाजपने योगेंद्र सिंह राण यांना मैदानात उतरवले होते.
ट्रेंडिंग न्यूज - हरियाणातील पराभवानंतर ठाकरेंच्या काँग्रेसला कानपिचक्या, थेट सुनावलं
निवडणूक निकालानंतर चित्र मात्र वेगळे दिसून आले. भाजपचे योगेंद्र राणा हे विजयी झाले. त्यांना 54 हजार 761 मते मिळाली. तर काँग्रेसच्या समशेर सिंह गोगी यांना 52 हजार 455 मते मिळाली. काँग्रेसच्या राणा यांना अवघ्या 2 हजार 306 मतांनी पराभव स्विकारावा लागला. त्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मराठा विरेंद्र वर्मा यांनी 4 हजार 218 मते घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या पराभवात पवारांनी इथे हातभार लावल्याची चर्चा आहे. इथे शरद पवारांचा उमेदवार जरी काँग्रेस बरोबर असता तरीही काँग्रेसला या मतदार संघात सहज विजय मिळवता आला असता. आपचा उमेदवारही इथे मैदानात होता. त्यालाही 4 हजार 290 मते मिळाली आहेत.
ट्रेंडिंग बातमी - कोकणात भाजपचे नमते? शिंदेंच्या सेनेला झुकते माप,भाजपच्या पदरात किती जागा?
हरियाणाचं काँग्रेसचं गणित अगदीच चुकलं. अनेक मतदार संघात आपच्या उमेदवारामुळेही काँग्रेसला फटका बसल्याचे आता समोर आले आहे. जर काँग्रेसने या छोट्या पक्षांना बरोबर घेतले असते. इंडिया आघाडी कायम ठेवली असती तर कदाचित हरियाण आज काँग्रेसची सत्ता असती. याचे मंथन आता काँग्रेस पक्षात केले जाईल. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची जशी चर्चा सुरू आहे तशीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या उमेदवारीची ही आता चर्चा होवू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world