जाहिरात

Actress molested during Holi : होळी पार्टीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार

धुळवडीच्या पार्टीदरम्यान अभिनेत्रीसोबत विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Actress molested during Holi : होळी पार्टीदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार

Actress molested during Holi : 'बुरा ना मानो, होली है' म्हणत अनेकदा धिंगाणा घातला जातो. मुलींवर फुगे फोडले जातात, इच्छा नसतानाही त्यांना रंग लावला जातो. यामध्ये अनेक विकृत संधी साधत महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही पाहायला मिळत. दारूच्या नशेत आणि होळीचं कारण देऊन आपण काहीही करू शकतो असा समज अनेक तरुणांना होतो. यातच मालिका क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

होळी पार्टीदरम्यान अभिनेत्रीसोबत झालेल्या प्रकारानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय अभिनेत्रीने अनेक मालिका आणि ओटीटीमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  

Shocking! आधी धुळवडीचा जल्लोष, नंतर काळाचा घाला;  राज्यात 15 जणांचा मृत्यू

नक्की वाचा - Shocking! आधी धुळवडीचा जल्लोष, नंतर काळाचा घाला; राज्यात 15 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी कंपनीच्या इमारतीच्या गच्चीवर धुळवडनिमित्ताने पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आरोपी (30 वर्षे) सहकलाकारही पार्टीत सहभागी झाला होता. तो मद्यधुंद असल्याचं सांगितलं जात आहे. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, मला त्याच्याबरोबर रंग खेळण्याची इच्छा नव्हती.

यासाठी त्याला मी नकार दिला होता. मात्र तरीही आरोपीने जबरदस्तीने मला रंग लावला आणि स्पर्श केला. या प्रकरणात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: