जाहिरात

Akola News : पाऊस सुरू असताना घराबाहेर पडला अन् चिमुकल्यावर काळाने झडप घातली..8 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू!

Akola Rain Incident News : अकोल्या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात जोरदार पाऊस पडल्याने हृदयद्रावक घटना घडली. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने हातरूण गावात एक घराची भिंत कोसळली.

Akola News : पाऊस सुरू असताना घराबाहेर पडला अन् चिमुकल्यावर काळाने झडप घातली..8 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू!
Akola News Today
मुंबई:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Rain Incident News : अकोल्या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात जोरदार पाऊस पडल्याने हृदयद्रावक घटना घडली. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने हातरूण गावात एक घराची भिंत कोसळली. या दुर्देवी घटनेत 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शेख हसनैन असं मृत पावलेल्या या लहान मुलाचं नाव आहे. शेख मधुकर नारायण गावंडे यांच्या घराजवळून जात असताना अचानक घराची भिंत कोसळली आणि या घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

त्या गावात नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, भिंत कोसळल्यानंतर गावातील लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेखला बाहेर काढण्यात आले. शेख गंभीर जखमी झाल्याने त्याला गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी शेखची आरोग्य तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केलं. या दुर्देवी घटनेमुळं हातरुण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळं गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा >> IMD Alert : मोंथा चक्रीवादळाचा दणका! पुढचे 'इतके' दिवस पाऊस घालणार धुमाकूळ, मुंबईसह 'या' ठिकाणी धो धो बरसणार

सरकारकडून मृताच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, गावकऱ्यांची मागणी

गावकऱ्यांनी या घटनेबाबत म्हटलंय की, अवकाळी पावसामुळे घरांच्या भिंती धोकादायक झाल्या होत्या. रहिवासी व घरमालकाने वेळेत खबरदारी घेतली असती तर हा अपघात टळला असता.अनेकांनी शासनाकडे तातडीने मदतीसाठी आणि पीडित कुटुंबाला सहाय्य देण्यासाठी मागणी केली आहे. भिंतीच्या दुरुस्ती, पावसामुळे होणाऱ्या अपघातांपासून संरक्षण, तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने हातरुण गावात ही घटना घडली. भविष्यात अशाप्रकारच्या दुर्देवी घटना घडू नये, यासाठी गावकरी, प्रशासनाने सावधगिरी बाळगून योग्य ती उपाययोजन राबवण्याची मागणी केली जात आहे. शेख हसनैनच्या कुटुंबीयांना सरकारकडून योग्य ती मदत मिळावी, अशीही मागणी केली जात आहे. पावसानं थैमान घातल्यावर गावतील लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहनही ग्रामस्थांकडून करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> Video: एअरपोर्टवर महागडं फूड घेऊ नका.., बाईनं काय दिमाग लावला, खाऊही मिळालं अन् पैशांचीही झाली बचत

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com