योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Shocking News : अकोल्याच्या घुसर येथे सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवल्याची केल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. राजू श्याम गोपनारायण (50) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राजू गोपनारायण यांच्याकडे 74 गुंठे (पावणे दोन एकर)शेती आहे. शेतीच्या मशागतीसाठी तसेच घरगुती गरजांसाठी त्यांनी बँकेकडून आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचा बोजा वाढत गेला आणि त्यांच्यावर जवळपास 4 लाख रुपयांचं कर्ज झालं होतं.सततच्या आर्थिक अडचणी,परतफेडीचा तगादा आणि मानसिक तणावामुळे त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे.
शेतात विषारी औषध अन् मृतदेह आढळला
आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास राजू गोपनारायण हे घरात नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरातही शोध घेतला, पण ते तिथेही नसल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांचा मुलगा तुषार व नातेवाईक शेतात गेले. त्यावेळी शेतात राजू गोपनारायण हे विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. ही आत्महत्येची घटना घुसर शिवारात त्यांच्या शेतातच घडली.दरम्यान, या घटनेमुळं त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नक्की वाचा >>सासू-सासरे, नणंदेसह पतीवर गुन्हा, सुनेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, नवी मुंबईतील संतापजनक घटना
पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर..
राजू गोपनारायण यांच्या पश्चात आई,भाऊ,अविवाहित मुलगा तुषार (25)आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचा मुलगा तुषार याचे पुढील महिन्याच्या 22 तारखेला लग्न ठरले होते. मुलाच्या लग्नाआधीच त्याच्या वडिलांनी जीवन संपवल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती अकोट फाईल पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
नक्की वाचा >> Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world