जाहिरात

खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना?, अशा शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

शरद सातपुते, सांगली

खेळताना गळफास लागून 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील सावंत प्लाट भागात ही घटना घडली आहे. अंजली खांडेकर असं चिमुकलीचं नाव आहे. चिमुरडीचा खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

चिमुरडीचा मृत्यू संशयास्पद नाही ना?, अशा शक्यतेने पोलिसांनी दीड तास चौकशी केली. अखेर वैद्यकीय तपासणीत गळफास बसून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती. 

अंजली शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण होते. दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. 

थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
महिला-तरुणींना मोफत बंदूक देण्याचा पहिल्या प्रयोग अमरावतीत करणार, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानामुळे पुन्हा खळबळ
खेळता खेळता लागला गळफास, सांगलीत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Court issued arrest warrant against Raj Thackeray, what is the case?
Next Article
राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी, काय आहे प्रकरण?