जाहिरात

पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप

गर्भवती माता आणि लहान मुलांना सकस आहाराचे वाटप केले जाते. आता या आहारातच चक्क मेलेला साप आढळून आला आहे.

पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप
सांगली:

राज्यात माता बालक पोषण आहार योजना राबली जाते.महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागा अंतर्गत ही योजन राबवली जाते. या माध्यमातून गर्भवती माता आणि लहान मुलांना सकस आहाराचे वाटप केले जाते. आता या  आहारातच चक्क मेलेला साप आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगलीच्या पळूसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना आहार वाटप करण्यात आला होता. सांगलीच्या पलूस येथील अंगणवाडीमधून हे वाटप करण्यात आले. त्यावेळी जो पोषण आहारात वाटला जात होता त्यात मेलेला साप आढळला. हा साप वाळा साप होता. 

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

डाळ,तांदूळ ,तिखट,मीठ एकत्र असणाऱ्या पॅकेटमध्ये हा वाळा साप आढळून आला आहे. गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना सरकारच्यावतीने हा पोषण आहार देण्यात येतो. या आहारात जेव्हा हा साप आढळला तेव्हा तिथे असलेल्या आंगणवाडी सेविका हबकल्या. त्यांनी तातडीने या आहराचे वाटप करण्याचे थांबवले. संपुर्ण राज्यात एकाच ठेकेदाराकडून या पोषण आहाराचे वाटप केले जाते. दरम्यान हा सापा त्या पॅकेटमध्ये कसा आला याची चौकशीची मागणी होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com